सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलचा वरचष्मा, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 11, 2021 | 7:29 AM

उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 जणांची अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत बिनविरोध निवड झालीय.

सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वसमावेशक पॅनेलचा वरचष्मा, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 संचालक बिनविरोध
सातारा जिल्हा बँक
Follow us

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्यात आलं आहे. तर, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह 11 जणांची अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत बिनविरोध निवड झालीय. उदयनराजे भोसले गृहनिर्माण व दुग्ध विकास संस्था गटातून बिनविरोध निवडून आलेत.

बिनविरोध निवडून आलेले संचालक

खरेदी विक्री – आमदार मकरंद पाटील
कृषी प्रक्रिया – शिवरूपराजे खर्डेकर
गृहनिर्माण – खासदार उदयनराजे भोसले
भटक्या विमुक्त जमाती – लहू जाधव
अनुसूचित जाती जमाती – सुरेश सावंत
औद्योगिक व विणकर – अनिल देसाई बिनविरोध

प्राथमिक कृषी पतपुरवठा गट मतदारसंघ

सातारा – आमदार शिवेंद्रराजे भोसले
फलटण – रामराजे नाईक-निंबाळकर
खंडाळा – दत्तानाना ढमाळ
वाई – नितीन पाटील
महाबळेश्वर – राजेंद्र राजपुरे

उदयनराजे भोसले यांच्या मॅरेथॉन भेटी यशस्वी

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णयाचे अधिकार राष्ट्रवादीनं शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सोपवल्याची चर्चा सुरु होती. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट म्हणून विधानरपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, फलटण मधील इतर लोक प्रतिनिधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटींमध्ये झालेल्या चर्चांचा फायदा उदयनराजे भोसले यांना झाल्याचं दिसून येत आहे.उदयनराजे भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा जिल्हा बँकेच्या आणि राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे.

यापूर्वी तीन उमेदवार बिनविरोध

सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले होते. जिल्हा बँकेची एकूण सदस्य संख्या 21 आहे.

इतर बातम्या:

भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!

प्रत्येक प्रवाशावर 1 रुपया कर आकारला जातो, महिन्याचे 21 कोटी, पडळकरांनी भ्रष्टाचारात थेट ‘मातोश्री’ला ओढलं

Satara District Co Operative Bank election eleven directors elected as unopposed at last date of withdrawal of forms including Udyanraje Bhonsle

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI