AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!

उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट म्हणून विधानरपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, फलटण मधील इतर लोक प्रतिनिधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली.

भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!
उदयनराजे भोसले, भाजप खासदार
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 4:20 PM
Share

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्यात आलं आहे. उदयनराजे भोसले यांची गृहनिर्माण व दुग्ध विकास संस्था गटातून बिनविरोध निवड झालीय. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजे यांच्या जागेला विरोध असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, अर्ज माघारी घेण्याची दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झालीय.तर, शिवेंद्रराजे भोसले यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात मध्यरात्री पर्यंत सुरु असलेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये घेण्यास मंजुरी देण्यात आली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झालीय. यामुळे उदयनराजे भोसले यांना आणखी एकदा  जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या मॅरेथॉन भेटी यशस्वी

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णयाचे अधिकार राष्ट्रवादीनं शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सोपवल्याची चर्चा सुरु होती. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट म्हणून विधानरपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, फलटण मधील इतर लोक प्रतिनिधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटींमध्ये झालेल्या चर्चांचा फायदा उदयनराजे भोसले यांना झाल्याचं दिसून येत आहे.उदयनराजे भोसले यांच्या बिनविरोध निवडीचा जिल्हा बँकेच्या आणि राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे.

सहकारमंत्र्यांच्या जागेकडं लक्ष

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील जिल्हा बँकेत मानद संचालक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक लढवत थेट संचालक होण्याचा निर्णय घेतला. सहकारमंत्र्यांनी यावेळी कराड तालुक्यातून सोसायटी गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कराडमध्ये त्यांच्यासमोर उदयसिंह पाटील यांचं कडवं आव्हान आहे. सहकारमंत्र्यांच्या जागेवर अजित पवार यांनी थेट उदयसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच तोडगा न निघाल्यानं अर्ज माघारीच्या दिवशी काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दिवसभरात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधातील अर्ज मागे घेतले जातात का हे पाहावं लागणार आहे.

यापूर्वी तीन उमेदवार बिनविरोध

सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले होते. जिल्हा बँकेची एकूण सदस्य संख्या 21 आहे.

इतर बातम्या:

सातारा जिल्हा बँक निवडणूक: सहकारमंत्र्यांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला, उदयनराजे भोसले यांचा भेटींचा सिलसिला यशस्वी होणार?

तुम्ही साथ द्या, मुंबई पुण्याच्या लोकांना इकडं यावं वाटेल असा हॅपनिंग, प्रगत सातारा बनवू, उदयनराजेंची तरुणाईला हाक

Udyanraje Bhonsle elected as unopposed in Satara District Co Operative Bank election

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.