AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhavana Gawali: आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आता भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?

भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भावना गवळी आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर होतात की हजर राहण्यासाठी वेळ मागतात हे पुढच्या काही वेळेत स्पष्ट होईल.

Bhavana Gawali: आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आता भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार?
Bhavana Gawali
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 11:20 AM
Share

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने 4 ऑक्टोबर म्हणजेच आज उपस्थित राहण्याचं समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला होता. खासदार गवळी आज ईडी चौकशीला हजर राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

भावना गवळी ईडी चौकशीला हजर राहणार का?

भावना गवळी यांना 28 सप्टेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या समन्स नुसार भावना गवळी यांना आज 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. समन्सनुसार भावना गवळी यांना आज 11 वाजता ईडी कार्यलयात हजर रहायचं आहे. भावना गवळी आज ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर होतात की हजर राहण्यासाठी वेळ मागतात हे पुढच्या काही वेळेत स्पष्ट होईल. ईडीचं समन्स आल्यानंतर भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

भावना गवळी यांच्यावर नेमके आरोप काय?

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

इतर बातम्या:

शिवसेनेचे ‘पंचरत्न’ ईडीच्या रडारवर, 5 बडे नेते अडचणीत, कोणावर कोणता आरोप?

भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी

Maharashtra Shivsena MP Bhavana Gawali summoned by ED to appear for enquiry in Money Laundering case today live updates

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.