AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठा अपघात थोडक्यात टळला, दोन लोकल समोरासमोर आल्या

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर मंगळवारी दुपारी एकाच मार्गावर दोन लोकल समोरासमोर आल्याने गोंधळ उडाला.त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.मात्र, मोटरमनने लोकल थांबवल्याने मोठा रेल्वे अपघात टळला. यामुळे ऐन पिकअवरला लोकल प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठा अपघात थोडक्यात टळला, दोन लोकल समोरासमोर आल्या
csmt station
| Updated on: Apr 22, 2026 | 10:02 AM
Share

मध्य रेल्वेचे अत्यंत वर्दळीचे स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( सीएसएमटी ) स्थानकावर दोन लोकल एकाच मार्गावर समोरा समोर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या वेळी दोन लोकल मधील अंतर अवघे १२० मीटर इतक होते असे म्हटले जात आहे.जर या दोन लोकलची टक्कर झाली असती तर भयंकर दुर्घटना घडली असती. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आता समिती नेमण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी पिक अवर सुरु होताना ही घटना घडल्याने लोकल प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला आहे.

कालच मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाजवळ सकाळी कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणारी एक रिकामी लोकल रुळावरून घसरल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली होती.त्यातच कालचा गोंधळ कमी होता की काय ते आज सायंकाळी चुकीचा सिग्नल दिल्याने दोन लोकल समोरसमोर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकलचे वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सीएसएमटी स्थानकावर मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन लोकल एकाच मार्गावर आल्या. या दोन लोकलच्या मध्ये एक सिग्नल होता. लोकल फलाटासाठी असलेला सीएसएमटी इंटरनल होम सिग्नल लाल झाला होता. त्यामुळे मोटरमनने लोकल थांबवली. यावेळी दोन्ही लोकलमध्ये केवळ १३० मीटर इतके अंतर होते. त्यामुळे मोठा अपघात टळल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर ऐन सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशाना नाहक मनस्ताप भोगावा लागला.अनेक लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या घटनेमुळे स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चुक कोणाची ? चौकशी होणार

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.१८ वाजता बदलापूर येथून आलेल्या  एक लोकलला  फलाट क्रमांक ४ च्या ऐवजी फलाट क्रमांक ५ चा  सिग्नल देण्यात आला. मात्र, त्याच वेळी फलाट क्रमांक ५ वर अन्य एक ( खोपोली ) लोकल उभी होती. या दोन्ही लोकल समोरासमोर आल्यामुळे फलाट क्रमांक ५,  ६,  ७ आणि ८ चे  मार्ग देखील बंद झाले होते. अखेर बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली. त्यानंतर खोपोली लोकल पुढे गेली.  त्यानंतर सीएसएमटीवरील लोकल सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली असून, नेमकी चूक कुठे झाली याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार