तस्करीप्रकरणात भाजप नेत्यावर मोठी कारवाई… भल्या पहाटेच महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक मोहीम… सापडले मोठे घबाड
DRI Big Action Against BJP Leader: तस्करीप्रकरणात भाजप नेत्याला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भल्या पहाटेच महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) तस्करीविरोधी मोठी कारवाई केली आहे. त्यात या नेत्याला अटक करण्यात आली. काय आहे हे प्रकरण?

DRI Big Action Against BJP Leader: तस्करीप्रकरणात एका कारवाईने सध्या खळबळ उडाली आहे. तस्करीप्रकरणात भाजप नेत्याला महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली आहे. भल्या पहाटेच ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. डीआरआयने केलेल्या कारवाईत भाजप नेत्यांसह त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठे घबाड महसूल गुप्तचर संचालनालयाच्या हाती लागले आहे. या कारवाईने मुंबईत सध्या खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?
महसूल गुप्तचर संचालनालयाकडून थेट अटक
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचेरकर यांना DRI कडून अटक करण्यात आली. ६ जून २०२६ रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास डीआरआयने ही कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) तस्करीविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. अजित आचेरकर यांच्यासह काही सहकाऱ्यांनाही या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. तर विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
इतक्या कोटींचे सोने जप्त
महसूल गुप्तचर संचालनालयाची (DRI) तस्करीविरोधातील या कारवाईत मोठे घबाड हाती लागले आहे.या कारवाईदरम्यान ५ कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अजित आचेरकर हे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस म्हणून कार्यरत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वात आचरेकर यांनी पक्ष प्रवेश केला होता. प्रकरण सध्या तपासाधीन असल्याची माहिती देण्यात आली आहे. न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेनंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काल नागपूरमध्ये मोठी कारवाई
काल नागपूरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली. ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवरून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या ट्रक पकडला. त्यात 522.554 किलो गांजा जप्त केला. या गांजाची बाजारातील किंमत 3 कोटींच्या घरात असल्याचे सांगतिले जाते. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक युनिटने ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले. पथकाने गांजा प्रकरणात दोघांना अटक केली. ट्रकमध्ये गुप्त कप्पे तयार करण्यात आले होते. त्यात 8 HDPE पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. ट्रकच्या खालील लॉक असलेल्या टूलबॉक्समध्ये आणि केबिनच्या छतावर हा गांजा लपवण्यात आला होता.