AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैसर्गिक रित्या बनवा तुमचे केस चमकदार आणि दाट, जाणून घ्या आयुर्वेदिक हेअर केअर टिप्स

हिवाळ्यात केसांची चमक टिकवून ठेवणे खूप अवघड काम आहे. केस निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी काही लोक हेअर ट्रीटमेंट करून घेतात त्यामुळे केस खराब होतात. जर तुम्हाला केसांना नैसर्गिक चमक मिळवून द्यायची असेल तर तुम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय ट्राय करून पाहू शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

नैसर्गिक रित्या बनवा तुमचे केस चमकदार आणि दाट, जाणून घ्या आयुर्वेदिक हेअर केअर टिप्स
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 9:21 PM
Share

लांब, दाट आणि चमकदार केस आजकाल सर्वांना आवडतात. पण त्यासाठी केसांची योग्य काळजी घेणेदेखील गरजेचे असते. केस चमकदार आणि मजबूत करण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केस धुण्यापासून ते तेल लावण्यापर्यंत केसांना दाट बनवण्यासोबतच योग्य आहार घेणे देखील गरजेचे आहे. आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे केस निर्जीव आणि कोरडे होतात. हिवाळ्यात कोरडे भारी असते त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. जर तुम्हाला हिवाळ्यात कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर तुम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय करू शकता. यामुळे तुमचे केस चमकदार आणि दाट होण्यास मदत होईल.

गरम पाण्याने केस धुणे टाळा

केस मजबूत करायचे असेल तर गरम पाण्याने केस धुऊ नका. खूप गरम पाण्याने केस धुतल्यास टाळूमध्ये असलेले नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. त्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा वाढतो आणि केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात.

टाळूची मालिश करा

केसांची मालिश करणे आयुर्वेदातही खूप फायदेशीर असल्याचे सांगितले गेले आहे. खोबरेल तेल किंचित गरम करून तुम्ही तुमच्या टाळूची मालिश करू शकता. यामुळे टाळूवर रक्ताभिसरण वाढते आणि केसांची वाढ वेगाने होते. आठवड्यातून किमान दोनदा टाळूला मालिश करा.

केस घट्ट बांधू नका

केसांना सुंदर बनवण्यासाठी अनेक हेअर स्टाईल सध्या ट्रेनिंग मध्ये आहे. पण घट्ट हेअर स्टाईल करणे शक्यतो टाळा. यामुळे तुमच्या केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात आणि याचा परिणाम टाळूवरही होतो. जेव्हा तुम्ही तुमचे केस बांधाल तेव्हा फक्त हलक्या हाताने बांधा.

रासायनिक ट्रीटमेंट टाळा

आजकाल अनेक लोक केसांची चमक वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक ट्रीटमेंट करतात. पण हे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. केसांना कलरिंग आणि केस स्ट्रेट केल्यामुळे केस खराब होऊ लागतात त्यामुळे केस अधिक तुटायला लागतात. या कारणामुळे केसांची केमिकल ट्रीटमेंट करून घेऊ नका.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा