AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजांच्या नाराजीचं कारण समजलं, तरीही म्हणतात मी नाराज नाही!

मुंबई:  राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या मराठा आरक्षणाबाबतच्या उपसमितीच्या सदस्य नसूनही त्याबाबतच्या बैठकीत घुसल्या होत्या. त्यानंतर त्या अवघ्या 15 मिनिटात नाराज होऊन बाहेर पडल्या. त्यांच्या नाराजीचं कारण आता समोर आलं आहे. “कुणबी आणि मराठा यांना एकत्र मिळून आरक्षणाची टक्केवारी देण्यावरुन पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले. कुणबी मराठा आधीच ओबीसीमध्ये आहेत. मराठ्यांना कुणबी […]

पंकजांच्या नाराजीचं कारण समजलं, तरीही म्हणतात मी नाराज नाही!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई:  राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या मराठा आरक्षणाबाबतच्या उपसमितीच्या सदस्य नसूनही त्याबाबतच्या बैठकीत घुसल्या होत्या. त्यानंतर त्या अवघ्या 15 मिनिटात नाराज होऊन बाहेर पडल्या. त्यांच्या नाराजीचं कारण आता समोर आलं आहे. “कुणबी आणि मराठा यांना एकत्र मिळून आरक्षणाची टक्केवारी देण्यावरुन पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले. कुणबी मराठा आधीच ओबीसीमध्ये आहेत. मराठ्यांना कुणबी मराठा वगळून आरक्षण देण्याचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी मांडला. पंकजा यांनी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे प्रश्न मांडले. याबाबत तिघांमध्ये धुसफूस झाल्याची पाहायला मिळालं. त्यानंतर पंकजा मुंडे थेट या बैठकीतून बाहेर पडल्या.

मी नाराज नाही – पंकजा मुंडे 

दरम्यान, मी मराठा आरक्षणावरुन नाराज नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर पंकजांनी माध्यमांशी संवाद साधला.

सदस्य नसताना पंकजा मुंडे बैठकीत घुसल्या, नाराज होऊन 15 मिनिटात बाहेर पडल्या!

दरम्यान, आज सकाळी मराठा आरक्षणाबाबतची उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी साडेदहा वाजता या बैठकीला सुरुवात झाली. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. मात्र आजच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात महिला बालविकास मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे याबैठकीतून बाहेर पडल्या. पंकजा मुंडे मराठा आरक्षणाच्या टक्केवारीवरुन नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सदस्य नसताना सुद्धा पंकजा मुंडे आत शिरल्या. त्या पोटतिडकीने काही प्रश्न चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे मांडत होत्या.  चंद्रकांत पाटील आणि  गिरीश महाजन त्यांना काही तरी मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत  होते. आरक्षणाच्या टक्केवारीवरून वाद असल्याचा अंदाज आहे.

मराठा समाजाला 10 किंवा 16 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबतच या बैठकीत चर्चा झाली. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला तसेच 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी नेत्यांची आहे. तर मराठा आरक्षण स्वतंत्र देणार, कोणत्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मात्र तरीही ओबीसी नेत्यांमध्ये धूसफूस आहे.

उपसमितीत कोण कोण आहे?

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत.

समितीकडे अधिकार काय?

कॅबिनेटने मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी 18 नोव्हेंबरला स्वीकारल्या. त्यानंतर मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली होती. आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही करण्याचा अधिकार मंत्रीमंडळ समितीला देण्यात आला आहे आणि याच समितीचा निर्णय अंतिम असेल. विचारविनिमयासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत.

मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळू शकतं?

मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळामध्ये अपेक्षित आहे. हे विधेयक कसे असेल याची अजून निश्चिती झाली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा मागास असल्याचे मान्य करत त्यांना आरक्षण देण्यात येईल. मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याची शिफारस विधेयकात असेल. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे 16 % आरक्षण असेल. राज्य सरकारच्या अधिकारातील घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) च्या आधारे मराठा समाजाला आरक्षण पुरवले जाईल. मराठ्यांना मिळणारे आरक्षण हे राजकीय क्षेत्रातले नाही. त्यामुळे पंचायत राज कायद्यानुसारच्या आरक्षणाचा त्यात समावेश नसेल.

Live Tv

संबंधित बातमी

मराठ्यांना 16 टक्के आरक्षण मिळाल्यास महाराष्ट्रातील परिस्थिती कशी असेल?

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?