शिवरायांच्या काळात जसे क्वीक रिझल्ट मिळायचे, तसे ‘राज’दरबारी मिळाले, मावळवासी कृष्णकुंजवर

| Updated on: Feb 22, 2021 | 12:30 PM

सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आभार मानले. (Maval MNS Raj Thackeray Toll )

शिवरायांच्या काळात जसे क्वीक रिझल्ट मिळायचे, तसे राजदरबारी मिळाले, मावळवासी कृष्णकुंजवर
मावळचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ कृष्णकुंजवर
Follow us on

मुंबई : वर्सोली आणि सोमाटणे-तळेगाव दाभाडे टोलनाक्यावर टोलमुक्ती मिळाल्याने मावळवासियांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा तातडीने परिणाम पाहायला मिळत असे, तसा ‘राज’दरबारी मिळाल्याने मावळवासियांना आनंद झाला आहे.” अशा भावना शिष्टमंडळातील सदस्य मिलींद अच्युत यांनी व्यक्त केल्या आहेत. (Maval residents thanks MNS Raj Thackeray after Toll exemption on Somatane and varsoli toll naka)

लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमाटणे- तळेगाव दाभाडे या दोन टोलनाक्यांवर मावळ तालुक्यातील वाहनचालकांना टोल माफ करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीने दिली. याचा फायदा MH 14 पासिंग असलेल्या मावळ भागातील रहिवाशांना होणार आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत आभार मानले.

राज ठाकरेंनी चूक दाखवल्यानंतर टोल बंद : नांदगावकर

मनसेने टोलचा मुद्दा उठवून धरला होता. शिष्टमंडळात सर्वच पक्षातील पदाधिकारी होते. अनेक वर्षांपासून हा टोल विषय प्रलंबित होता. त्या मावळवासियांना आज न्याय मिळाला. नियमांचे उल्लघंन करून टोल स्वीकारला जात होता. राज ठाकरेंनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर हा टोल बंद झाला, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

राज ठाकरेंचा म्हैसकरांना फोन

गेल्या वेळच्या भेटीत राज ठाकरेंनी भरबैठकीतच थेट आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांना फोन लावला होता. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा तातडीने परिणाम पाहायला मिळत असे, तसा ‘राज’दरबारी मिळाल्याने मावळवासियांना आनंद झाला आहे.” अशा भावना शिष्टमंडळाने व्यक्त केल्या आहेत. (Maval residents thanks MNS Raj Thackeray after Toll exemption on Somatane and varsoli toll naka)

MH-14 पासिंग वाहनांना तूर्तास टोलमाफी

पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाचा संकेतांक MH-14 आहे. सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावर टोलमाफी देण्याची दीर्घ काळापासून स्थानिक मागणी करण्यात येत होती. अखेर टोल हटाव संघर्ष समितीच्या मागणीला एमएसआरडीसी आणि आयआरबीकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. तूर्तास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे आणि लोणावळ्यातील वरसोली टोलनाक्यावर MH-14 पासिंग असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. त्यामुळे टोल हटाव संघर्ष समितीकडून आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

तळेगावातील सोमाटणे टोलनाक्याला विरोध, स्थानिक ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंचा म्हैसकरांना फोन

तुमच्या गाडीचा नंबर MH14 आहे का? ‘या’ टोलनाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार

(Maval residents thanks MNS Raj Thackeray after Toll exemption on Somatane and varsoli toll naka)