Mumbai : टाईपराईटरने गणपतीचं चित्र काढणं शक्य आहे? दादरच्या रिटायर्ड बँकरने शक्य करुन दाखवलंय

| Updated on: Sep 04, 2022 | 7:08 AM

टेलिफोनचे नंबर टाईपरायटरवर साकारुन दाखवण्याचं काम त्यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी टेलिफोनच्या शेपमध्ये हे नंबर टाईपराईटरने चित्रासारखे हुबेहूब उतरवले होते. यानंतर त्यांना विश्वास आला. त्यांनी काही चित्र टाईपराईटरवर साकारण्याचा प्रयत्न आणि त्यांना यशही आलं.

Mumbai : टाईपराईटरने गणपतीचं चित्र काढणं शक्य आहे? दादरच्या रिटायर्ड बँकरने शक्य करुन दाखवलंय
चंद्रकांत भिडे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : चित्र काढण्यासाठी ब्रश, पेन्सिल, रंग कॅनव्हास, ईझल असं सगळं सर्वसाधारण साहित्य वापरलं जातं. पण चित्रकला (Drawing Art) साकारण्यासाठी एकाने चक्क टाईपरायटर (Typewriter artist) वापरलाय. टाईपरायटर वापरुन चित्र काढली जाऊ शकतात, हे एका अवलियाने शक्य करुन दाखवलंय. आतापर्यंत तब्बल 500 गणपती बाप्पा मुंबईकर चंद्रकांत भिडे यांनी टाईपरायटरच्या माध्यमातून साकारलेत. दादरमध्ये राहणाऱ्या चंद्रकात भिडे (Chandrakant Bhide) यांची ही कला इतर कलांच्या तुलनेत खास आहे. टाईपराईटरने चित्र काढणं, हे पेन्सिल, ब्रश किंवा रंगाच्या मदतीने चित्र काढण्यापेक्षाही कठीण आहे. पण चंद्रकांत भिडे यांच्यासाठी हा डाव्या हाताचा मळ असल्यासारखंय. हे खास टॅलेंट त्यांना गणपती बाप्पानेच दिल्यासारखं आहे जणू. 64 कला आणि 12 विद्या येत असलेल्या गणपती बाप्पाची चित्र टाईपराईटरने काढणं हे चंद्रकांत भिंडे यांचं विशेष कसब आहे.

कोण आहेत चंद्रकांत भिडे?

टाईपराईटर आर्टिस्ट म्हणूनही चंद्रकांत भिडे ओळखले जातात. टाईपराईटरवर साकारलेले गणपती बाप्पा भिडे आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना वाढदिवसाची भेट म्हणून देत असतात. एक ते दीड तासात त्यांना गणपती बाप्पाचं चित्र काढायला लागतो, असं त्यांनी म्हटलंय. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रकांत भिडे हे एक निवृत्त बँक कर्मचारी आहेत.

आता भिडे यांचं वय 77 वर्ष आहे. ते यूनिअर बँकेत कामाला होते. आता ते निवृत्त झालेत. त्यांना जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घ्यायचं होतं. पण ते काही शक्य झालं नाही. पुढे गरज म्हणून बँकेत नोकरी करावी लागली. पण तरिही कलेनं त्यांची सााथ सोडली नाही. बँकेत त्यांच्या बॉसने त्यांना एक काम दिलं होतं.

हे सुद्धा वाचा

कशी झाली सुरुवात?

टेलिफोनचे नंबर टाईपरायटरवर साकारुन दाखवण्याचं काम त्यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी टेलिफोनच्या शेपमध्ये हे नंबर टाईपराईटरने चित्रासारखे हुबेहूब उतरवले होते. यानंतर त्यांना विश्वास आला. त्यांनी काही चित्र टाईपराईटरवर साकारण्याचा प्रयत्न आणि त्यांना यशही आलं. बँकेचे चेअरमन असलेल्या पनिरसेल्वम यांनी भिडे यांना 1996 साली टाईपराईटर भेट दिला होता. अवघ्या 1 रुपया घेऊन निवृत्तीच्यावेळी भिडे यांना टाईपराईटर भेट देण्यात आला होता.

आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचं चित्रही भिडे यांनी टाईपराईटरच्या मदतीने काढलं होतं. हे चित्र पाहून स्वतः ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मणदेखील अवाक् झाले होते. आतापर्यंत भिडे यांच्या चित्रांची 12 प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत. भिडे यांनी लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, अनेक दिग्गज अभिनेते आणि नेते मंडळींचीही हुबेहूब प्रतिकृती टाईपराईटरच्या माध्यमातून कागदावर उतरवलीय.