मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलदर वाढले, ऐरोली टोलनाक्यावर मनसेच्या ‘खाली डोकं वर पाय’च्या घोषणा

| Updated on: Oct 01, 2020 | 2:17 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि महागाईला सर्वसामान्य जनता सामोरी जात असतानाच मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलदर वाढले, ऐरोली टोलनाक्यावर मनसेच्या खाली डोकं वर पायच्या घोषणा
Follow us on

नवी मुंबई : मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्सवर टोलदरात वाढ झाल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक पवित्रा घेत ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन केले. टोल दरामध्ये 5 ते 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ‘या सरकारचे करायचं काय? खाली डोकं वरती पाय’ अशी घोषणाबाजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली टोल नाक्यावर केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. (MNS Protest at Airoli Toll Naka against increase in Toll)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि महागाईला सर्वसामान्य जनता सामोरी जात असतानाच आजपासून (गुरुवार 1 ऑक्टोबर) टोलच्या दरात वाढ झाली आहे. टोलदरात पाच ते 25 रुपयांची वाढ झाली असून मासिक पासही महागला आहे. त्यामुळे दररोज मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नाही, मात्र टोलदरात वाढ होत असल्याने वाहनचालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या टोलनाक्यांवर नवीन दर काय

*छोटी वाहने – 40 रुपये
*मध्यम अवजड वाहने – 65 रुपये
*ट्रक आणि बसेस – 130 रुपये
*अवजड वाहने – 160 रुपये
*हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ
*पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 वर

(MNS Protest at Airoli Toll Naka against increase in Toll)

संबंधित बातम्या :

रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

(MNS Protest at Airoli Toll Naka against increase in Toll)