AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, पहिल्यांदाच अत्यंत खास व्यक्तीही सोबत, डिनर डिप्लोम्सीसोबतच युतीची चर्चा?

आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वाढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मातोश्रीवर कौटुंबिक स्नेहभोजनाच्या निमित्ताने झालेल्या भेटीतही राजकीय विषयांवर गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, पहिल्यांदाच अत्यंत खास व्यक्तीही सोबत, डिनर डिप्लोम्सीसोबतच युतीची चर्चा?
| Updated on: Oct 12, 2025 | 1:14 PM
Share

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अनेक पक्षातील नेते हे भाषण विविध घोषणाबाजी करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंमधील जिव्हाळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज दुपारी १२.३० च्या सुमारास शिवतीर्थ या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन महिन्यात सलग सातव्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या सलोख्यानंतर आता मातोश्रीवर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरेंसोबत एक खास व्यक्तीही पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यावेळी पहिल्यांदाच अत्यंत खास व्यक्तीसोबत मातोश्रीवर दाखल झाले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या आईसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर दिली. मात्र या स्नेहभोजनाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये विविध राजकीय विषयांवर गंभीर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच भाजप आणि सध्याच्या सत्ताधारी युतीविरोधात एकी साधण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचे विभाजन टळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार

राज ठाकरे यांच्या मातोश्रीवर वाढलेल्या फेऱ्यांमुळे सध्या मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सलग सात वेळा भेट झाली आहे. त्यामुळे ही भेट फक्त कौटुंबिक मर्यादेपुरती आहे का? की यातून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा.

Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार