AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा

MPSC Drug Inspector exam Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण परीक्षा पेपर फुटीप्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या लव्ह अँड हेट स्टोरीतून हे बिंग फुटले. पण यामागे मोठा आर्थिक व्यवहार ठरल्याचे आता समोर आले आहे.

MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? 'तो'आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण परीक्षा पेपर फुटीप्रकरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 28, 2026 | 10:39 AM
Share

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण परीक्षा पेपर फुटीप्रकरणात एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या लव्ह अँड हेट स्टोरीपूरतंच हे प्रकरण मर्यादित नाही. याप्रकरणातील अर्थपूर्ण व्यवहार आता तपासाच्या रडारवर आला आहे. ऋतुजा पाटील हिचे नवे व्हॉट्सअप संभाषण समोर आले आहे. त्यात आर्थिक व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपरफुटीसाठी मोठी डील झाल्याचा आकडा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा दुसरा अँगल समोर आला आहे.

5 नाही 50 लाखांची डील

एमपीएससी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप संभाषण समोर आले आहे. मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आधी मिळवण्यासाठी 50 लाख भरले असे ऋतुजा मैत्रिणीला सांगताना यात पाहायला मिळतेय. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार 5 लाखात पेपर फुटला अशी माहिती समोर येत होती, मात्र ऋतुजाच्या चॅटमध्ये 50 लाखांचा दावा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एमपीएससीमधील तीन अधिकारी सध्या गुन्हे शाखेच्या अटकेत आहे. मात्र 50 लाखांच्या ऋतुजाच्या दाव्याने भुवया उंचावल्या आहेत. पेपर फक्त 5 लाखात फुटला की त्याची आणखी मोठी किंमत ऋतुजाच्या वडिलांनी दिली होती याचाही तपास सुरू आहे.

12 लाखांच्या व्यवहाराचा तपास

याप्रकरणात पैशांचा व्यवहाराही तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रवीण पाटीलकडून पैशांची मागणी होत असल्याने अमृत पाटील चिंतेत असल्याचे ऋतुजाने मैत्रिणीला सांगितल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत अमृत यांनी प्रवीणला 12 लाख रुपये दिल्याची माहिती मिळाली आहे. अमृत पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यातील संपर्काचा दुवा म्हणून मयूर ठाकरे हे एक नाव समोर येत आहे. ऋतुजाच्या संभाषणातून मिळालेल्या या धाग्याच्या आधारे पोलीस आता ठाकरेसह अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

ते प्रश्न कुणाला पुरवले?

अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील 294 प्रश्नांपैकी प्रत्यक्षात किती प्रश्न कुणाकुणाला पुरवण्यात आले, याचा शोध सुरू आहे. यासाठी आरोपींच्या मोबाईलमधील संभाषण, संदेश आणि इतर माहिती तापसली जाणार आहे. प्रवीणसह दोघांनीही परीक्षा काळानंतर नवीन मोबाईल घेतल्याचे समोर आले आहे. ऋतुजा पाटील हिला जे प्रश्न पुरवण्यात आले. त्यातील 78 प्रश्न परीक्षेत आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप