AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील बिझनेसमनकडून उकळली 2.25 कोटीची खंडणी, थेट पर्सनल माहिती बाहेर काढण्याची धमकी

ती त्यांच्या इमारतीमध्येही घरकामासाठी येत असल्याने त्याने तिला त्यांच्या घरी कामासाठी ठेवले होते. 9 सप्टेंबरला त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रवेशासाठी दहा लाख रुपये आणले होते.

ED च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील बिझनेसमनकडून उकळली 2.25 कोटीची खंडणी, थेट पर्सनल माहिती बाहेर काढण्याची धमकी
Money
| Updated on: Sep 18, 2026 | 7:06 AM
Share

ब्रिजभान, प्रतिनिधी : मुंबईतील व्यावसायिकाकडून 2.25 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी जयपूरमधील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) दोन अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जयपूरमध्ये तैनात असलेल्या ईडीच्या दोन अधिकाऱ्यांवर मुंबईतील एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून 2.25 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. हा आरोप केल्यानंतर गोरेगावच्या बांगूर नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे.

विंट्री टेक प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक अमूल्य वस्सा यांनी तक्रार केली आहे. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, दोघां आरोपीनी वासा यांची प्रतिष्ठा खराब करण्याची धमकी दिली आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या माहितीचा उल्लेख केला.

मुंबईत वकिलाच्या घरी मोलकरणीची 10 लाखांच्या कॅशवर हातसफाई

घरातील साफसफाई करताना मोलकरणीने सुमारे 10 लाखांच्या कॅशवर हातसफाई केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वकिलाच्या तक्रार अर्जावरुन वांद्रे पोलिसांनी संशयित मोलकरीण तनुजा हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. यातील तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे परिसरात राहतात. त्यांचा रुम लहान असल्याने त्यांचे आई-वडिल जवळच असलेल्या एका इमारतीमध्ये राहत असून त्यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून तनुजा ही तरुणी घरकाम करते.

ती त्यांच्या इमारतीमध्येही घरकामासाठी येत असल्याने त्याने तिला त्यांच्या घरी कामासाठी ठेवले होते. 9 सप्टेंबरला त्यांनी त्यांच्या मुलीच्या प्रवेशासाठी दहा लाख रुपये आणले होते.ही रक्कम त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या घरी ठेवली होती. दुसऱ्या दिवशी त्यांची बहिण ही रक्कम घेण्यासाठी गेली होती, मात्र तिला तिथे ती कॅश सापडली नाही.

त्यांच्या घरी तनुजा वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे ही कॅश तिनेच चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी तनुजाविरुद्ध दहा लाखांची कॅशची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तनुजाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...