AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 महिने पोलिसांना चकवा, फक्त एक चूक अन्… मुंबईच्या ड्रग्ज क्वीनचा कसा झाला गेम ओव्हर?

मुंबई पोलिसांनी टिटवाळा येथे मोठी कारवाई करत ५ कोटी ७ लाख रुपये किंमतीच्या एक्स्टेसी (MD) गोळ्यांसह एका ३५ वर्षीय महिला तस्कराला अटक केली आहे. ही ड्रग्ज क्वीन गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देऊन गृहिणीच्या वेषात लपून बसली होती.

2 महिने पोलिसांना चकवा, फक्त एक चूक अन्... मुंबईच्या ड्रग्ज क्वीनचा कसा झाला गेम ओव्हर?
Drug
| Updated on: Apr 20, 2026 | 12:45 PM
Share

मुंबईत ड्रग्जचा काळाबाजार करून गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका ३५ वर्षीय महिला तस्कराला अखेर टिटवाळ्यातून अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेच्या घरातून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल ५ कोटी ७ लाख रुपये किंमतीच्या एक्स्टेसी (MD) गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे टिटवाळा आणि कल्याण ग्रामीण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कशी झाली अटक?

मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलला मुंबईत झालेल्या एका मोठ्या ड्रग्ज कारवाईत या महिलेचे नाव मुख्य सप्लायर म्हणून समोर आले होते. तेव्हापासून ही महिला मुंबईतून फरार झाली होती. अटक टाळण्यासाठी तिने टिटवाळा गाठले. यानंतर तिने टिटवाळ्यातील पद्मावती सोसायटीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. यावेळी तिने आपण एक साधी गृहिणी असल्याचे सर्वांना भासवले. गेल्या दोन महिन्यांपासून ती तिथे राहत होती. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घाटकोपर एएनसीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. यानंतर त्यांनी मध्यरात्री घराची झडती घेतली.

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने टिटवाळा येथील पद्मावती सोसायटीमध्ये छापा टाकला असता पोलिसांना मोठा धक्का बसला. या घराच्या झडतीमध्ये ४,०५६ एमडी (एक्स्टेसी) गोळ्या सापडल्या, ज्याचे एकूण वजन २ किलो ३०० ग्रॅम इतके आहे. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ७ लाख रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा सापडल्याने हे एखादे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ड्रग्ज क्वीनचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही

वरिष्ट पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. प्राथमिक चौकशीत ही महिला केवळ सप्लायर नसून, मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज टोळीचे संचालन करत असल्याचे समोर आले आहे. ही महिला मूळची नवी मुंबईची असून तिच्या संपर्कात असणारे इतर साथीदार कोण आहेत, हे अंमली पदार्थ कुठून आले आणि कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांनी तपासाच्या गोपनीयतेसाठी या ड्रग्ज क्वीनचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र लवकरच या प्रकरणातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...