AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai First Non AC Local Train: बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन, वैशिष्ट्ये काय?

Mumbai First Non AC Local Train: मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकलवरील गर्दी हा नेहमी चर्चेचा विषय असतो. लोकलमधील प्रवास एखाद्या युद्धावर जाण्यापेक्षा नक्कीच कमी नसतो. हा धाडसी प्रवास लाखो मुंबईकर रोज करतात. सुरक्षित प्रवासासाठी आता बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन धावणार आहे, काय आहे तिचे वैशिष्ट्ये?

Mumbai First Non AC Local Train: बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन, वैशिष्ट्ये काय?
बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन, वैशिष्ट्ये काय? Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 11, 2026 | 4:00 PM
Share

Mumbai First Non AC Local Train: मुंबईतीलच नाही तर भारतातील पहिली नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल ट्रेन धावणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. ही रेल्वे 12 कोचची आहे. या लोकलचा क्रमांक 268201-268212 असा आहे. हा भारतीय रेल्वेतील एक खास प्रोटोटाईप आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक लोकलची गरज आहे. लोकलवरील गर्दी कमी करण्यासाठी मेट्रो आणि पाण्यावरील टॅक्सीचाही प्रयोग करण्यात येत आहे. त्यासोबतच लोकलचा प्रवास सुरक्षित करण्यावर भर देण्यात येत आहे.

ट्रेनच्या डिझाईनमध्ये काय खास?

चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये (ICF) या ट्रेनचे खास डिझाईन तयार करण्यात आले आहे. ही एक वेस्टिब्युल ट्रेन आहे. त्यामध्ये सहा सहा डब्बे असतील. सहा डब्ब्यांचे दोन युनिट आहेत. एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात जाता येईल. महिलांसाठी आरक्षित डब्बे असतील. या रेल्वेत कोणताही फर्स्ट क्लास डब्बा नसेल. या बंद दरवाज्याच्या नॉन एसी रेल्वेमुळे सुरक्षेचा प्रश्न मिटणार आहे. कुणालाही दरवाजात लटकता येणार नाही.

हवा खेळती राहण्यासाठी काय सुविधा?

सर्वात मोठे आव्हान हे या डब्ब्यातील हवा येण्याविषयीचे आहे. पण चिंता करण्याची गरज नाही. या नॉन एसी डब्ब्यांच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स लावण्यात आले आहे. छतावर ब्लोअर्स लावण्यात आले आहेत. त्यातून सातत्याने ताजी हवा येत राहील आणि प्रवाशांना दमटपणाचा त्रास होणार नाही. खेळती हवा असेल. विशेष म्हणजे पावसाळ्यात या ब्लोअर्सच्या डिझाईनमुळे पावसाचे पाणीही डब्ब्यात शिरणार नाही.

अत्यंत गर्दीच्या वेळी ही नॉन एसी बंद दरवाज्याची लोकल धावेल. या लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बंद करण्याची सिस्टिम आहे. यामध्ये सेन्सर, टॉकबॅक, प्रवाशांसाठी स्टेशनची माहिती देणारे डिस्प्ले बोर्ड असेल. तर डब्ब्यात कार्बन डायऑक्साईड जमा होऊ नये यासाठी खास सुविधा आणि सोय करण्यात आली आहे. ही लोकल कधी धावणार याविषयीची मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण त्यासाठी प्रवाशांना अजून काही महिने लागू शकतात. या लोकलच्या काही चाचण्या अद्याप बाकी आहे. त्यानंतर ही लोकल धावेल.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!