AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपचार घेणाऱ्या तरुणीकडून माहिती घेताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये, दरवाजा तोडून आत घुसले, ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर

Goregaon Drugs Case : गोरेगाव मधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये एका इव्हेंटदरम्यान ड्रग पार्टी झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आता पोसिलांनी एका आरोपीला फिल्मी स्टाईलने अटक केली आहे.

उपचार घेणाऱ्या तरुणीकडून माहिती घेताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये, दरवाजा तोडून आत घुसले, ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर
police and drugsImage Credit source: Google
| Updated on: Apr 14, 2026 | 3:58 PM
Share

मुंबईच्या गोरेगाव मधील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये एका इव्हेंटदरम्यान ड्रग पार्टी झाल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री 999 999 999 लाईव्ह या डीजे कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले होते. जवळपास साडेचार हजार तरुण तरुणींनी या कॉन्सर्टची तिकीट घेतली होती. या कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगची विक्री आणि सेवन करण्यात आले होते. ही कॉन्सर्ट संपल्यानंतर काही तरुण-तरुणी हे बेशुद्ध अवस्थेत नेस्को एक्जीबिशन सेंटर परिसरात आढळून आले. त्यांना रुग्णालयामध्ये नेले असता त्यापैकी दोन जणांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये एका तरुणाचा आणि तरुणीचा समावेश आहे. यानंतर एका जखमी तरुणीच्या जबाबानंतर आता पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत.

या प्रकरणी वनराई पोलिसांनी उपचार सुरू असलेल्या तरुणीच्या जबाबदाच्या आधारावर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना 16 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात पार्टीचा आयोजक, नेस्को सेंटरचा व्यवस्थापक आणि काही ड्रग विक्रेत्यांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांवर सदोष मनुष्यवध, लोकांच्या जीविताला धोका पोहोचवणे, अंमली पदार्थ विरोधी कायदा, दारूबंदी कायदा अशा विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी

  • विहान उर्फ आकाश सामल, आयोजक
  • सनी जैन, व्यवस्थापक, नेस्को सेंटर
  • बालकृष्ण कुरुप, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक,नेस्को
  • रौनक खंडेलवाल ड्रग विक्रेता
  • आनंद पटेल, ड्रग विक्रेता
  • प्रतीक पांडे, ड्रग विक्रेता

पोलिसांकडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न

या प्रकरणातील ड्रग्स सप्लायर आनंद पटेलला अटक करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. आनंद पटेल याला कल्याण मधील मोहन हाइट्स इमारतीतून अटक करण्यात आली. पोलीस त्याला अटक करण्यासाठी इमारती पोहचले असता, त्याने दरवाजा लावून घेतला. यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर आनंदने दरवाजा उघडला. सध्या खडकपाडा पोलिसांनी आरोपीला वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले असून वनराई पोलिसांकडून ड्रग्सचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या कॉन्सर्टच्या आयोजकांनी काही परवानगी घेतल्या होत्या. मात्र तरी या ठिकाणी नियम पायदळी तुडवण्यात आले. या कॉन्सर्टला दहा वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती मात्र हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कार्यक्रम संपल्यानंतरही काही उलट बाजू तरुणांनी ब्लूटूथ स्पीकर लावून या परिसरात धिंगाणा घातला. कार्यक्रमाच्या प्रवेशावेळी तरुणांची मोठी गर्दी झाली होती. मेटल डिटेक्टर आणि बारीकेट वर चक्क तरुण चढले आणि त्यांनी कॉन्सर्टच्या हॉलमध्ये प्रवेश मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन आहे, मात्र पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.