AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केक कापला, अंडी, दगड फेकलं अन् नंतर बर्थडे बॉयलाच पेटवलं; मुंबईत नेमकं काय घडलं? CCTV पाहून उडेल थरकाप

मुंबईतील कुर्ल्यात वाढदिवसाच्या पार्टीत धक्कादायक घटना घडली. मित्रांनी २१ वर्षीय अब्दुल रहमानवर अंडी, दगड आणि पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. अब्दुल गंभीर भाजला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच मित्रांना अटक केली आहे.

केक कापला, अंडी, दगड फेकलं अन् नंतर बर्थडे बॉयलाच पेटवलं; मुंबईत नेमकं काय घडलं? CCTV पाहून उडेल थरकाप
Kurla birthday fire
| Updated on: Nov 26, 2025 | 8:22 AM
Share

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली एका मित्रावर अंडी, दगड आणि त्यानंतर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अब्दुल रहमान नावाचा २१ वर्षीय तरुण गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी इमारतीमध्ये राहणाऱ्या अब्दुल रहमानचा सोमवारी (२५ नोव्हेंबर) २१ वा वाढदिवस होता. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याचे पाच मित्र त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी इमारतीखाली बोलावले. मित्रांनी सोबत केकही आणला होता. अब्दुलच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल खाली आल्यानंतर त्याचे पाच मित्र अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, आणि शरीफ़ शेख यांनी सुरुवातीला केक कापला. त्यानंतर अब्दुलवर अंडी फेकली. दगड फेकले.

यावरच न थांबता या मित्रांनी स्कूटीवरुन एका बाटलीत आणलेला ज्वलनशील पदार्थ आणला होता. तो अब्दुलच्या अंगावर टाकला आणि त्याला आग लावली. अचानक आग लागल्याने अब्दुल रहमानने आपले कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो भाजला. जखमी झालेल्या अब्दुल रहमानला तातडीने जवळच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सोसायटीमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे.

पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल

पीडित अब्दुल रहमानने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यानंतर विनोबा भावे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान, शरीफ़ शेख या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम ३ (५) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने या पाचही आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास विनोबा भावे पोलीस करत आहेत. आरोपींनी अब्दुलवर टाकलेला ज्वलनशील पदार्थ नेमका काय होता, याची पोलीस पडताळणी करत आहेत. हा गुन्हा केवळ वाढदिवसाच्या मस्करीतून झाला की यामागे काही कटकारस्थान होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...