Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताना लोकलचे वेळापत्रक पाहा, या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock Sunday 18 October 2026: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक असेल. उद्या उपनगरीय मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी उद्या वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणे सोयीस्कर ठरेल.

Mumbai Local Megablock Sunday 18 October 2026: रविवार आणि मेगा ब्लॉक असे समीकरण जुनेच आहे. मुंबईकरांना याची सवय असली तरी महत्त्वाच्या कामापूर्वी तुमचा खोळंबा होऊ नये याची काळजी घ्या. कारण उद्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक असेल. उद्या उपनगरीय मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी उद्या वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणे सोयीस्कर ठरेल. सणासुदीला खरेदीसाठी बाहेर पडताना वेळेचे नियोजन केल्यास नाहकचा मनस्ताप टाळता येईल.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर आणि हार्बर ट्रान्स हार्बर लाईनवर पनवेल-वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11:05 ते 4:05 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
कुठे : ठाणे ते कल्याण
कधी : सकाळी ९ ते दुपारी १
परिणाम : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान मेल/एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येतील.
यामुळे या गाड्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
वसई रोड येथून सकाळी ९.५० वाजता सुटणारी
वसई रोड – दिवा मेमू गाडी कोपर स्थानकावरच अंशतः रद्द केली जाईल.
दिवा येथून सकाळी ११.३० वाजता सुटणारी दिवा-वसई रोड मेमू गाडी कोपर स्थानकावरून सकाळी ११.४५ वाजता सुटेल.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल ते सीएसएमटी व ठाणे
कधी- सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५
परिणाम: पनवेल येथून सकाळी
१०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत सीएसएमटी येथे जाणाऱ्या आणि सीएसएमटी येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
तसेच पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणे येथे जाणाऱ्या आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेल येथे जाणाऱ्या लोकल रद्द राहणार आहेत.
या कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असतील.
