Mumbai Local : ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी स्थानकाजवळ OHE वायर तुटली, वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा, जुईनगरहून ठाणे जाण्याचा पर्याय

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी स्थानकाजवळ OHE वायर तुटली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-सानपाडा स्थानकांवर संध्याकाळी 7.15 पासून गाड्या बंद आहेत. तर ठाणे - जुईनगर/पनवेल आणि हार्बर मार्गावर गाड्या या सुरळीत सुरू आहेत.

Mumbai Local : ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी स्थानकाजवळ OHE वायर तुटली, वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा, जुईनगरहून ठाणे जाण्याचा पर्याय
LocalImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:54 PM

मुंबई : मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरात धावणाऱ्या लाकल ट्रेन (Mumabai Local) म्हणजे मुंबईकरांसाठी शरीरातील रक्तवाहिन्यांसारखं काम करतात. रोज लाखो प्रवासी या लोकलने प्रवास (Local Train) करतात. लोकलाच काही काळ जरी खोळंबा झाला तरी मुंबईकरांनी आणि उपनगरातील प्रवाशांची तारांबळ होते. आजही तसाच काही प्रकार नवी मुंबईत घडलाय. कारण नवी मुंबईत ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी स्थानकाजवळ OHE वायर तुटली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी-सानपाडा स्थानकांवर संध्याकाळी 7.15 पासून गाड्या बंद आहेत. तर ठाणे – जुईनगर/पनवेल आणि हार्बर मार्गावर गाड्या या सुरळीत सुरू आहेत. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्ग सध्या चालू आहे, मात्र संध्याकाळी अचानक वाशी ते सानपाडा रेल्वे स्थानकात ओवरहेड वायर तुटल्याने वाशी पासून ठाणेकडे जाणारी रेल्वे सेवा खंडित आहे. त्यामुळे वाशीपासून ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाशी स्थानकात पाहायला मिळते. ठाण्याला जाण्यासाठी जुईनगर होऊन रेल्वे चालू आहे.

दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

हा बिघाड दुरुत्तीचे काम हे रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रात्रीची वेळ असल्याने तसेच मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक भागात रिमझीम पाऊस सुरू झाल्याने दुरुतीतही काही अडथळे येत आहेत. मात्र लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण होईल आणि हा मार्ग पुन्हा सुरळीत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. बिघाड झाल्याचे लक्षात येताच तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत काम सुरू केले आहे. त्यामुळे जास्त काळ हा मार्ग बंद राहणार नाही.

जुईनगरहून गाडी पकडण्याचा पर्याय

प्रवाशांना जुईनगरहून ठाण्याकडे जाण्याचा तसेच मुंबईकडे येण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. मुंबईकडून जाण्याऱ्या प्रवाशांना जुईनगरमध्ये उतरून ठाण्याला जाणाऱ्या लोकल पकडता येणार आहे. तर ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या लोकांनासाठी जुईनगरहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या पकडण्याचा पर्याय हा उपलब्ध असणार आहे.

पावसात प्रवाशांची तारांबळ

मुंबईसह उपनगरात सध्या पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आपल्या घरी पोहोचण्यासाठी यावेळी प्रवाशांची लगबग सुरू होती. तसेच बरेच ऑफीस सुटण्यााचीहीह ही वेळ असल्याने या वेळेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सख्या ही सहाजिकच जास्त असते. मात्र ही वायर तुटल्याने रोजच्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यांना जास्त गर्दीचा आणि लांब पल्ल्याचा मार्ग स्विकारावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.