AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकर गाईडलाईन पाळतात, ज्यांना राजकारण करायचं, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील : किशोरी पेडणेकर

जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल," असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar On ED)

मुंबईकर गाईडलाईन पाळतात, ज्यांना राजकारण करायचं, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील : किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर, महापौर
| Updated on: Dec 30, 2020 | 3:13 PM
Share

मुंबई : “यंदा नवीन वर्षाचं स्वागत घरी राहूनच करा,” असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुंबईकरांना केले आहे. “मुंबईकरांनो कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या. मार्चपासून सर्व सण घरीच साजरे करण्यात आले आहेत. नवीन वर्षात घरीच बसून जल्लोष करा. एकाच्या चुकीमुळे अनेकांना अडचणीत आणू नका,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar On New Year Celebration)

“यंदा घरी बसून 31 डिसेंबरला रात्री प्रार्थना करा. नवीन वर्षाचं स्वागत करा. मुंबईकर गाईडलाईन पाळत आलेले आहेत. ज्यांना यात राजकारण करायचं आहे. त्यांच्यावर पालिका आणि पोलीस कारवाई करतील,” असा टोला किशोरी पेडणकरांनी लगावला.

“कोरोना रात्रीचा फिरतो का? अस म्हणणाऱ्यांना कळलं पाहिजे की नवीन वर्ष स्वागत करताना रात्री गर्दी होते. म्हणून हे निर्बंध आहेत. राजकारणी लोकांना जर मुंबईकरांच्या जीवावर उठायचं असेल तर याला कायदा आहे,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

“2020 वर्ष हे कधी विसरु शकणार नाही. कोरोनामुळे अनेक जण मृत्यू पावले आहे. नातेवाईक, अनेक जवळ लोक सोडून गेलेत. कोरोना काळ आणि हे वर्ष विसरणार नाही,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

“ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था, सत्य निश्चितपणे बाहेर येईल”

“ईडी ही आपल्या देशाची महत्त्वाची संस्था आहे. जे काही सत्य आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे जनतेचे देखील मत आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत हातात मिळाले आहे. परंतु निश्चितपणे जे सत्य आहे ते बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

“31 डिसेंबरला नियमांचे पालन करणे गरजेचे”

“कोरोना महामारीमुळे नववर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उद्या 31 डिसेंबर आहे. जगातील अनेक पाश्चात्त्य देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्याचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे राज्यात राबवण्यात येणाऱ्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेला यापुढे सहकार्य करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सहकार्य करायचे आहे,” असेही त्यांनी सांगितले. (Mumbai Mayor Kishori Pednekar On New Year Celebration)

“राज्यात 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर याचे पालन केले नाही, तर निश्चितपणे पोलीस योग्य ती कारवाई करतील,” असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

“येणारे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे जावो,” अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“घरातील मंगलकार्याच्या शुभेच्छा देण्यासाठी राऊतांची भेट” 

“शिवसेना नेते संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत. ते शिवसेनेचे सचिव आहे. त्यामुळे महिन्यातून एक-दोन वेळा त्यांची भेट होत असते. घरात मंगल कार्य आहे. त्याचे आमंत्रण देण्यासाठी राऊतांची भेट घेतली,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी राऊतांच्या भेटीनंतर दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar On New Year Celebration)

संबंधित बातम्या : 

सिद्धिविनायक दर्शनावेळी राज ठाकरेंचा ‘मसल मॅन’ सोबतीला, कंगनाला मनसेचा छुपा पाठिंबा?

weather forecast | मुंबईत पारा 17 अंशावर, माथेरानमध्ये मुंबईपेक्षा अधिक थंडी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...