Mayor Ritu Tawde: गुजरात सरकारने दाद दिली नाही, मुंबईच्या महापौर सिंह आणण्यासाठी थेट गुजरात दौऱ्यावर जाणार

Mayor Ritu Tawde: महापौर रितू तावडे यांनी गुजरात सरकारकडे पत्रव्यवहार करून परवानगी मागितली होती. मात्र त्या पत्रव्यवहाराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Mayor Ritu Tawde: गुजरात सरकारने दाद दिली नाही, मुंबईच्या महापौर सिंह आणण्यासाठी थेट गुजरात दौऱ्यावर जाणार
Ritu Tawade
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 8:08 AM

मुंबई महापालिकेच्या राणीच्या बागेत सिंहांची जोडी आणण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीच्या बागेत पर्यटकांसाठी आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आशियाई सिंहांची एक जोडी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापौर रितू तावडे गुजरात दौऱ्यावर जाणार असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची थेट भेट घेणार आहेत.

राणीच्या बागेत सध्या विविध प्राणी-पक्षी असले तरी सिंहांची जोडी नसल्याने पर्यटकांना ते आकर्षण उपलब्ध नव्हते. महापालिकेचा मानस आहे की एक नर आणि एक मादी सिंह येथे आणून पर्यटकांसाठी विशेष आकर्षण निर्माण करावे. या सिंहांची जोडी गुजरातमधील जुनागड येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आशियाई सिंह हे गुजरातच्या गिर जंगलात आढळतात आणि सक्करबाग प्राणिसंग्रहालय हे त्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथून सिंहांची जोडी मिळाल्यास मुंबईतील प्राणिसंग्रहालयाला मोठा लाभ होईल.

Loading...

पत्रव्यवहाराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही

याआधी महापौर रितू तावडे यांनी गुजरात सरकारकडे पत्रव्यवहार करून परवानगी मागितली होती. मात्र त्या पत्रव्यवहाराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महापौर या भेटीत सिंहांची जोडी मुंबईत आणण्यासाठी गुजरात सरकारची औपचारिक परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करतील. याशिवाय सिंहांची देखभाल, सुरक्षित वाहतूक आणि राणीच्या बागेतील योग्य व्यवस्था याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

राणीचे बाग हे मुंबईतील ऐतिहासिक आणि लोकप्रिय उद्यान आहे. येथे सिंहांची जोडी आल्यास मुंबईकर तसेच पर्यटकांना मोठा आनंद मिळेल. मुलांना वन्यजीवांबद्दल माहिती मिळेल आणि प्राणिसंग्रहालयाची ओळखही वाढेल. महापालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक तयारी सुरू केली असून गुजरात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास लवकरच सिंहांची जोडी मुंबईत दाखल होऊ शकते. महापौर रितू तावडे यांचा हा दौरा राणीच्या बागेच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us