AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबईकडे परस्पर वळवल्याचा आरोप, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे FDA ला पत्र

मुंबई शहरासाठी वितरित झालेला ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत परस्पर वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Mumbai oxygen tank diverted)

मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबईकडे परस्पर वळवल्याचा आरोप, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे FDA ला पत्र
दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा
| Updated on: May 03, 2021 | 1:18 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यामुळे सरकारकडून ऑक्सिजनची तूट भरुन काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने परस्पर त्यांच्याकडे वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आमच्या वाट्याचा ऑक्सिजन आम्हाला द्या, अशी मागणी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पि. वेलारासू यांनी केली आहे. (Mumbai oxygen tank diverted to Thane and Navi Mumbai Additional Municipal Commissioner’s letter to FDA)

मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पि. वेलारासू यांनी याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई पालिकेला दिला, असा गंभीर आरोप केला आहे.

प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्चित

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येक राज्य हे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त कसा होईल यासाठी झगडत आहेत. मात्र या परिस्थितीत पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई शहरासाठी वितरित झालेला ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत परस्पर वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारने गरज आणि रुग्णसंख्येनुसार प्रत्येक शहरासाठी प्राणवायूचा हिस्सा निश्चित केला आहे. त्यानुसार मुंबईसाठी 234 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येतो. सतरामदास गॅसेस कंपनीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला हा ऑक्सिजन मिळतो.

मुंबईसाठीचा ऑक्सिजन वळवण्यात आल्याची माहिती 

मुंबई महापालिका हा साठा आपली रुग्णालये आणि जम्बो कोरोना केंद्रांना पुरवते. हीच कंपनी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईला प्राणवायूचा पुरवठा करते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुरवठादार कंपनीकडे मुंबईसाठी येणाऱ्या टँकरमधील काही टन ऑक्सिजन हा नवी मुंबई आणि ठाण्यासाठी वळवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उत्पादक कंपनीने पाठविलेल्या कागदपत्रांवर उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या हिश्श्याचा तब्बल 114 मेट्रीक टन द्रवरुप प्राणवायू पाच दिवसांमध्ये अद्याप शहरात पोहोचू शकला नाही.

दोषींवर कारवाई करा

यामुळे यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच हा मुंबई महापालिकेच्या वाट्याचा ऑक्सिजन त्यांना द्यावा, अशी मागणी मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पि. वेलारासू यांनी केली आहे. (Mumbai oxygen tank diverted to Thane and Navi Mumbai Additional Municipal Commissioner’s letter to FDA)

संबंधित बातम्या : 

मुंबईकर ऐकेनात, अखेर महापौर किशोरी पेडणेकरांनी हात जोडले; म्हणाल्या…

चिकन मटण दुकानं रविवारी उघडणार का? आंब्यांचं काय? खवय्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली, सर्वाधिक मृत्यूदर कोणत्या जिल्ह्यात?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...