AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains | मुंबईत पावसाची दमदार हजेरी, पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता

एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईत होणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी (Mumbai Rain) साचले.

Mumbai Rains | मुंबईत पावसाची दमदार हजेरी, पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता
| Updated on: Jun 06, 2020 | 8:30 AM
Share

मुंबई : निसर्ग चक्रीवादळानंतर एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबई शहरासह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, किंग्ज सर्कल या भागात पावसाने जोर धरला आहे. तर दुसरीकडे गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात वीजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. (Mumbai Rain)

मुंबईत होणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. किंग्ज सर्कल, मालाड या काही भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच गाड्यांमध्ये पाणी गेल्यामुळे गाड्याही बंद पडल्या आहेत. तर विलेपार्ल्यात अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नालासोपारा, वसई विरार या ठिकाणीही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.

नालासोपाऱ्यात रस्त्याच्या बाजूला पाणी साचले 

वसई विरार, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे. तर नालासोपारा पूर्व तुलिंज, आचोले रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे.

मिरा भाईंदर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मिरा रोड, भाईंदर या ठिकाणी पावसाने जोर धरला आहे.

ठाणे, कल्याणमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार

एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कल्याण डोंबिवलीत पुन्हा जोरदार हजेरी लावली. कल्याण डोंबिवली परिसरात रात्रभरापासून पावसाची रिपरिप कायम आहे. मात्र अद्याप या ठिकाणी कुठेही पाणी साचलेले नाही.

ठाण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. विजांच्या कडकडाट पावसाने ठाण्यातील काही ठिकाणी हजेरी लावली. पहाटेची वेळ असल्याने रस्ते निर्मनुष्य आहे. मात्र काही प्रमाणात गाड्या सुरु आहेत.

पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता 

पुणे शहर आणि परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे पुण्यात जूनच्या पहिल्या पाच दिवसात 101.01 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. (Mumbai Rain)

संबंधित बातम्या : 

Mumbai Rains | मुंबईत पावसाळ्यातील 24 दिवस सतर्कतेचे, समुद्रात कधी किती उंच लाटा उसळणार?

Cyclone Nisarga | मुंबईवरचा धोका टळला, चक्रीवादळ पुढे सरकले : हवामान विभाग

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ