AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, बादल्या भरून ठेवा! 18 तास नळाला पाणी येणार नाही; कोणत्या विभागात कधी कपात?

मुंबईतील शिवडी परिसरात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे २२ आणि २३ एप्रिल रोजी १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 'ए', 'बी', 'सी', 'ई' आणि 'एफ-दक्षिण' या विभागांतील पाणी कपातीचे सविस्तर वेळापत्रक येथे वाचा.

मुंबईकरांनो, बादल्या भरून ठेवा! 18 तास नळाला पाणी येणार नाही; कोणत्या विभागात कधी कपात?
mumbai water cut
| Updated on: Apr 21, 2026 | 8:32 AM
Share

मुंबईतील जलवाहिन्यांची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने शिवडी परिसरात महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. या कामामुळे बुधवार २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून ते गुरुवार, २३ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत अशा सलग १८ तासांसाठी मुंबईतील पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. मुंबईतील पाच महत्त्वाच्या विभागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होणार आहे.

शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर १,५०० मिमी व्यासाचे दोन नवीन ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्ती कामासाठी मोठा जलविभाजक बंद ठेवावा लागणार आहे. यामुळे ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. ऐन उन्हाळ्यात हे काम काढण्यात आल्यामुळे मध्य आणि दक्षिण मुंबईतील अनेक सोसायट्या आणि झोपडपट्टी परिसरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या दुरुस्तीमुळे काही भागांत पाणी पूर्णपणे बंद असेल. तर काही भागांत अत्यंत कमी दाबाने पुरवठा होणार आहे. याचा फटका प्रामुख्याने रुग्णालय परिसराला बसणार आहे, त्यामुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.

कोणकोणत्या विभागात कधी पाणी बंद?

१. ‘ए’ विभाग (बुधवारी पूर्णपणे बंद)

दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय आणि व्यावसायिक पट्ट्यात बुधवारी पाणी नसेल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर, पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि नौदल डॉकयार्ड या भागांचा समावेश आहे.

२. ‘बी’ विभाग (बुधवार आणि गुरुवार)

बुधवारी: उमरखाडी, नूरबाग, चिंच बंदर, वाडी बंदर, दाणा बंदर, कारागृह मार्ग, रामचंद्र भट्ट मार्ग आणि बीपीटी रेल्वे परिसर.

गुरुवारी पहाटे: महम्मद अली रोड, मशीद बंदर स्थानक परिसर, इमामवाडा, अब्दुल रहमान स्ट्रीट, मेमनवाडा आणि नखोडा मोहल्ला.

३. ‘सी’ विभाग (गुरुवारी पहाटे बंद)

दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या बोरा बाजार, एसबीयूटी (SBUT) क्षेत्र, सरदार वल्लभभाई पटेल रोड, पाकमोडिया मार्ग, बापू कोटे मार्ग आणि झाम रस्ता परिसरात गुरुवारी पहाटे होणारा पाणीपुरवठा बंद राहील.

४. ‘ई’ विभाग (कमी दाबाने आणि बंद)

बुधवारी: माझगाव कोळीवाडा, डॉकयार्ड रोड, काळाचौकी, घोडपदेव नाका, राणीबाग, म्हाडा संकुल भाग, नेसबिट रोड, एन. एम. जोशी मार्ग, मदनपुरा, बदलूपुरा, नागपाडा, शेख हाफिझुद्दीन मार्ग, मेघराज शेट्टी मार्ग, गणेश हरि पारुंडेकर मार्ग, डिमटिमकर मार्ग, डिमटिमकर मार्ग, उंद्रिया रस्ता, खंडिया रस्ता, टेमकर रस्ता, शेख कमरुद्धीन रस्ता, मस्तान टँक मार्ग, काझीपुरा, डंकन मार्ग, जे. जे. रोड, म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, एम. एस. अली मार्ग, बेलासिस मार्ग, कामाठीपुरा, एस. पी. मार्ग, आग्रीपाडा, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी या भागात पाणी नसेल.

कमी दाबाने पुरवठा: मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा आणि भायखळा परिसरात गुरुवारी कमी दाबाने पाणी मिळेल. तसेच जेजे, नायर आणि कस्तुरबा या मोठ्या रुग्णालयांनाही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

५. ‘एफ-दक्षिण’ विभाग (मध्य मुंबई)

गुरुवारी: शिवडी, वडाळा (पूर्व), अभ्युदयनगर, परळ गाव आणि शिवडी कोळीवाडा भागात पाणी नसेल.

कमी दाबाने पुरवठा: लालबाग, परळ, हिंदमाता आणि दादर विभागात गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयातही १८ तास पाणी टंचाई जाणवू शकते.

महानगरपालिकेचे आवाहन

दरम्यान पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी आधीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, 16 ते 17 एप्रिलपर्यंत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सुरुवातीचे ४ ते ५ दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, जेणेकरून आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, अशी सूचना पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...