BIG BREAKING | समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा अटकेपासून संरक्षण, पण…, नेमके निर्देश काय?

| Updated on: May 19, 2023 | 6:14 PM

Sameer Wankhede Latest News : समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

BIG BREAKING | समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा अटकेपासून संरक्षण, पण..., नेमके निर्देश काय?
sameer wankhede
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात आज दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंर कोर्टाने समीर वानखेडे यांना 24 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. समीर वानखेडे यांची याचिका 24 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पण तोपर्यंत कोर्टाने समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 24 मे पर्यंत अटक न करण्याचा निर्देश दिला आहे. कोर्टाने सीबीआयला वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर वानखेडे यांनी सीबीआयला तपासात सहकार्य करावं, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच कोर्टाने सीबीआयला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

वकील रिझवान मर्चंट आणखी काय म्हणाले?

“ही संपूर्ण केस बेकायदेशीर आहे. चार महिन्याच्या आता ज्या तारखेला पब्लिक सरवंटने एक चुकीचा निर्णय घेतला होता, त्या चुकीच्या निर्णयावरुन डिपार्टमेंटला लागतंय की, या प्रकरणी भ्रष्टाचाराचे कायदे लागू शकतात. कार्डिलिया केस हे 2021 ची आहे. एफआयआरमध्ये कपिल नावाच्या व्यक्तीची तक्रार आहे”, असं वकिलांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“कोर्टाने प्रकरण 22 तारखेपर्यंत तहकूब केलंय. पण आम्ही विनंती केली की, समीर वानखेडे हे सीबीआयच्या चौकशीसाठी नियमितपणे सीबीआयच्या कार्यालयात जातील. त्यांनी 41 एची नोटीस दिली आहे. या नोटीस अंतर्गत जर व्यक्ती चौकशीला सामोरं जातात तर त्यांना अटक होत नाही”, असं देखील वकिलांनी सांगितलं.

“सीबीआयवर आम्हाला शंका आहे. कारण कोणतंही कारण समोर करुन समीर वानखेडे यांना अटक केलं जाऊ शकतं. त्यामुळे आम्ही सीबीआयला विनंती केली की, सेक्शन 41 A3, 41 (3),(4) ला एकत्र करु नये. कोर्टाने याबाबतची विनंती स्वीकारली आहे. सीबीआय 22 मे पर्यंत समीर वानखेडे यांना अटक करु शकणार नाही. एनसीबी 22 तारखेला प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणार. त्यानंतर व्हेकेशन जजच्या समोर सुनावणी पार पडेल”, अशी माहिती वकिलांनी दिली.

“याचिकेत समीर वानखेडे यांचे एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यासोबतचे संभाषण जोडण्यात आले आहेत. तुमचा प्रश्न आहे की, शाहरुख खानसोबतचे संभाषण समोर का आले आहेत? तर आर्यन खानची जेव्हा जेलमधून सुटका झाली तेव्हा आपली एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याविषयी तक्रार नाही, असं म्हटलं होतं. पण सोशल मीडियावर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत”, असं वकील मर्चट म्हणाले.

शाहरुख खानच्या समीर वानखेडे यांच्याकडे अक्षरश: याचिका

दरम्यान, समीर वानखेडे यांनी आपल्या रिट याचिकेत एक मोठा खुलासा झालाय. आर्यन खान याच्या अटकेनंतर समीर वानखेडे आणि शाहरुख खान सातत्याने संपर्कात होते. त्यांच्यातील संभाषण आता समोर आलं आहे. या संभाषणात शाहरुख खानने मुलाला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केल्याचं समोर आलं आहे.

“मुलाचं आयुष्य बरबाद होऊ देऊ नका. तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं करा. मी कुणाकडेही मदत मागितलेली नाही. माझी ताकद कुठेही वापरलेली नाही. माझं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही. त्यामुळे तुमच्यातील माणुसकीच्या नात्याने जे काही करता येईल ते करा आणि त्याला लवकरात लवकर घरी कसं येता येईल, त्यासाठी प्रयत्न करा”, अशी विनंती शाहरुख खानकडून समीर वानखेडे यांच्याकडे केली जात होती.

या संभाषणात एक गोष्ट समोर येतेय, दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीने संभाषण सुरु होतं. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही. पैशांच्या व्यवहाराबद्दल संभाषण झालेलं नव्हतं. हे सर्व संभाषण समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत जोडलं आहे.

संभाषणात नेमकं काय म्हटलंय?

शाहरुख खान : कृपया मला कॉल कर. आर्यन खानचा वडील म्हणून मी तुझ्याशी बोलेन, तू चांगला माणूस आहे आणि एक चांगला पतीदेखील आहेस आणि मी सुद्धा. कायद्यामध्ये राहून माझ्या कुटुंबासाठी मी तुझ्याकडे मदत मागत आहे. मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला जेलमध्ये जाऊ देऊ नको.

शाहरुख खान : जेलमध्ये गेल्यानं माणूस खचून जातो. तू मला प्रोमिस केलं आहे, माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्या आणि माझ्या परिवारावर दया कर. माझ्या मुलाला घरी पाठव, मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागतो.

समीर वानखेडे : शाहरुख खान मी तुला चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलं होईल. तू कुझी काळजी घे.