रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचे पक्षाला आदेश, सीएम फंडासाठी राष्ट्रवादीने पेटारा उघडला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचे पक्षाला आदेश, सीएम फंडासाठी राष्ट्रवादीने पेटारा उघडला!
Sharad Pawar
| Updated on: Apr 30, 2021 | 5:11 PM

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief minister relief Fund) मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) पेटारा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे. (NCP donate 2 crore rupees to Maharashtra Chief minister relief Fund after Sharad Pawars advice said Jayant Patil)

लसीकरणासाठी (Vaccination) मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन, जयंत पाटील यांनी केलं.

महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले.

राष्ट्रवादीचं ट्विट

बाळासाहेब थोरातांची मोठी मदत

दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. थोरात यांनी स्वत:चं एक वर्षाचं आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर थोरातांच्या अमृत उद्योग समूह संगमनेरच्या 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाचे पैसेही सीएम फंडात देण्यात येणार आहेत.

बाळासाहेब थोरात यांचं ट्विट 

संबंधित बातम्या 

सोशल मीडियावर वैद्यकीय मदत मागणाऱ्यांवर कारवाई केलीत तर यादा राखा, सुप्रीम कोर्टाने ठणकावलं

Remdesivir Import : गरज 2 लाख इंजेक्शनची, उत्पादन फक्त 67 हजार, केंद्र 4.5 लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आयात करणार

(NCP donate 2 crore rupees to Maharashtra Chief minister relief Fund after Sharad Pawars advice said Jayant Patil)