AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम गोऱ्हेंचा किरीट सोमय्यांना खोचक टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. त्यावरून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांवर जहरी टीका केली. (neelam gorhe taunt kirit somaiya over ravan dahan)

रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम गोऱ्हेंचा किरीट सोमय्यांना खोचक टोला
डॉ. नीलम गोऱ्हे
Reporter Hemant Birje
Reporter Hemant Birje | Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. त्यावरून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांवर जहरी टीका केली. रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा, अशी खोचक टीका निलम गोऱ्हे यांनी केली.

निलम गोऱ्हे आज षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खोचक टीका केली. किरीट सोमय्या आजच्या दिवशी रावण दहन करत आहेत. रावणाला ही वाटत असावे हा माझ्या तावडीत सापडायला हवा. किरीट सोमय्या हे बेरोजगार आहेत. रोजगार म्हणून रोज काहीतरी ते करत असतात, असा चिमटा निलम गोऱ्हे यांनी काढला.

शिवसेना ही मुंबईची आई

शिवसेना हे आपले दायित्व साजरे करत आहे. तर काही परप्रांतीयांना आणून राजकारण करत आहेत, असं सांगतानाच शिवसेना ही मुंबईची आई आहे. काहीजण दाईची भूमिका घेत आहेत, असा टोला त्यांनी मनसेला लगावला.

मुश्रीफांना अटक होणारच

दरम्यान, रावणाचं दहन करण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्राची जनता ठाकरे-पवार माफिया सरकारच्या राक्षसी वृत्तीचं दहन करणार, हे मी वचन देत आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील. आर्धे कोर्टात धक्के खात असतील, आर्धे ईडी, कुणी सीबीआय तर कुणी इन्कम टॅक्सकडे, तर कुणी मुंबई पोलिसात असेल. कालपासून जेलमध्ये जायची सुरुवात झालीय. आम्ही एक वर्षापूर्वीच मंत्री जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाणार असं सांगितलं होतं. अखेर जितेंद्र आव्हाडांना अटक झाली. जितेंद्र आव्हाडांनी आनंद करमुसेंचं अपहरण केलं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्रय दिला होता. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनाही जेलमध्ये जावं लागणार. त्यानंतर खासदार भावना गवळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार. शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, असं सोमय्या यांनी सांगितलं.

पवारांची माया बाहेर येणार

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे नातू पार्थ पवार, आमदार रोहित पवार कुठे गेले सर्व पवार? देशातील सर्वात मोठी आयकर विभागाची धाड सुरू आहे. धाडीचा नऊवा दिवस आहे. पवारांनी किती माया (पैसे) जमावली आहे ते काही दिवसांत बाहेर येणार. अजित पवारांच्या बेनामी प्रॉपर्टीचा मी खुलासा केला. याबाबत अजित पवारांकडून आजपर्यंत काहीही स्पष्टता आलेली नाही. या घोटाळेबाजांना धडा शिकवण्यासाठी चला आपण रावण दहन करुया, असं सोमय्या म्हणाले.

तुरुंगात जावं लागलं तरी बेहत्तर

आज आम्ही ठाकरे-पवार घोटाळेबाज सरकारच्या भ्रष्टाचारी वृत्तीचं दहन करत आहोत. या घोटाळेबाज सरकारला घालवण्यासाठी मला अंदमान-निकोबार जेलमध्ये जावं लागलं तरी मी हसत-हसत जाणार. माझ्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केलाय. एकवेळा काय, सतरा वेळा जेलमध्ये जाणार. पण या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त सरकार करुन दाखवणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

Nihang Sikh : सिंघू सीमेवर तरुणाचे हात कापल्यानं निहंग शीख चर्चेत, मुघलांसह अफगाणी फौजांना अडवणारा समुदाय वादात का?

कार्यकर्ते म्हणाले, ‘अजितदादा आगे बढो…’; अजित पवार म्हणतात, अजून किती पुढं जाऊ?

Dussehra 2021 Live Updates | थोड्याच वेळात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होणार, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष

(neelam gorhe taunt kirit somaiya over ravan dahan)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश