AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Exam: आलिशान क्लास… भपकेबाज जाहिरात… कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा…डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी

NEET- JEE Coaching Business: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका पेपरफुटीचे सर्वच कनेक्शन राज्याशी जुळल्याने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे शिक्षकातील नराधम महाराष्ट्रातील आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांच्या भरवशावर गेल्या काही वर्षांपासून अशा शिक्षकांचा गोरखधंदा तेजीत आहे. कमाईचे आकडे डोळे फिरवणारे आहेत.

NEET Exam: आलिशान क्लास... भपकेबाज जाहिरात... कोचिंगच्या नावाखाली मोठा गोरखधंदा...डोळे फिरवेल कमाईची आकडेवारी
JEE and NEET कोचिंग क्लासेसImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 19, 2026 | 12:38 PM
Share

NEET- JEE Coaching Business: नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यापासून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महापापामध्ये महाराष्ट्रातील बडी शिक्षकी धेंडांचा सहभाग चिंताजनक आहे. शिक्षण क्षेत्रातील या नराधमांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला आहे. त्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. तर गेल्या काही वर्षामध्ये सुवर्ण भविष्याचे स्वप्न दाखवत कोचिंग क्लासेसचे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत पेव फुटले आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या भरवशावर त्यांची कोट्यवधींची कमाई सुरू आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात गल्लेभरू स्पर्धा उभी ठाकल्याने क्लास संचालकांचे खिसे मात्र गरम होत आहे. त्यांची कोट्यवधींची कमाई होत आहे.

कोचिंगचा व्यवसाय २० हजार कोटींच्या पुढे

देशातील खासगी शिकवणी वर्गांचा व्यवसाय २० हजार कोटींच्या पुढे पोहचला आहे. जेईई-नीटसह स्पर्धा परीक्षांमुळे कोचिंग इंडस्ट्रीचा झपाट्याने विस्तार झाला आहे. दिल्ली, कोटा, पुणे, नागपूरसह अनेक मोठ्या शहरांत कोचिंगचे जाळे विस्तारले आहे. आता छोट्या शहरांमध्येही शाखा विस्तारावर भर असल्याने सगळीकडेच कोचिंगचे फॅड वाढले आहे. जेईई, नीट, यूपीएससी, एमपीएससीसाठी विशेष प्रशिक्षण देणाऱ्या संस्था वाढल्या लाखो विद्यार्थ्यांमुळे कोचिंग व्यवसाय तेजीत आहे.

हे गणित टाकणार चक्रावून

वैद्यकीय शिक्षणाच्या एक लाख जागांसाठी २० ते २२ लाख विद्यार्थी स्पर्धेत, यातील तब्बल ९० टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गांवर अवलंबून आहेत. आयआयटी-एनआयटीच्या मर्यादित जागांमुळे स्पर्धा तीव्र आहे. नामांकित क्लासेसकडून आयआयटी-नीट प्रवेशाची ‘१०० टक्के हमी’ देतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी मोठ्या फीच्या आमिषाला बळी पडतात. दोन वर्षांसाठी २ ते ३ लाख रुपयांपर्यंत फी आकारली जाते

एका कोचिंग संस्थेत तब्बल २५ हजारांपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश एका क्लासचा वार्षिक व्यवसाय २५० कोटींच्या घरात जातो. मोठ्या निकालाच्या दबावामुळे पेपरफुटीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. काही संचालक पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांकडे वळत असल्याचे बडी धेंड पकडल्यानंतर समोर आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निवासी कोचिंगची नवी पद्धत समोर आली आहे. राहण्यासोबतच शिक्षणाची एकाच ठिकाणी सुविधा देण्यात येत आहे.

कोचिंग क्लासेसचे कनिष्ठ महाविद्यालयांशी साटेलोटे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा फक्त नावापुरता कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येतो. अकरावी-बारावीची महाविद्यालये ओस पडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून कठोर कारवाई होत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष आहे. लाखो रुपये खर्चूनही यशाची खात्री नाही. जेईईमध्ये ७७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना ५० पेक्षा कमी गुण पडतात. नीटमध्येही वास्तव अत्यंत धक्कादायक आहे. ८८ हजार जागांसाठी पात्र ठरणाऱ्यांचे प्रमाण फक्त ५ टक्क्यांच्या आसपास आहे.

GST चा आकडा वळवेल बोबडी

देशात कोचिंग इंडस्ट्रीचा धंदा जोमात आणि जोरात आहे. गेल्या चार-पाच वर्षांतील जीएसटीचे आकडे गरागरा डोळे फिरवणारे आहेत. कोचिंग इन्स्टिट्यूशनमधून दुप्पटीहून अधिकचे कलेक्शन झाले आहे. अर्थ मंत्रालयानुसार, 2019-20 मध्ये कोचिंग संस्थानमधून 2240.73 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला. तर 2023-24 मध्ये ही संख्या वाढून 5517.45 कोटी इतकी झाली. याशिवाय 2020-21 मध्ये कोविड दरम्यान हा आकडा 2215.24 कोटी होता. तर 2021-22 मध्ये 3045.12 कोटी आणि 2022-23 मध्ये 4667.03 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून जमा झाला.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?