AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून युवराजांना पेंग्विन म्हणताना महापौर उत्साहात दिसत होत्या; नाव न घेता नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

आज पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेतील दुफळी आता सर्वांसमोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

...म्हणून युवराजांना पेंग्विन म्हणताना महापौर उत्साहात दिसत होत्या; नाव न घेता नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नितेश राणे
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 12:17 PM
Share

मुंबई : आज पुन्हा एकदा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. पंचेचाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना यावेळी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना तिकीट देणार नसल्याची छुपी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यावरून शिवसेनेचे अनेक विद्यमान नगरसेवक नाराज आहेत. म्हणूनच युवराजांना पेंग्विन म्हणतात असे स्वतःच जाहीर करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उत्साहात दिसत होत्या असा चिमटा नितेश राणे यांनी घेतला आहे. तसेच शिवसेनेमधील अंतर्गत दुफळी देखील स्पष्टपणे दिसून येत असल्याचे यावेळी राणे यांनी म्हटले आहे. दिशा सालियन प्रकरणावर चर्च नको असे संजय राऊत यांनी किशोरी पेडणेकर यांना आधीच  सांगितले होते. मात्र तरी देखील किशोरी ताई थांबल्या नसल्याचे नितेश यांनी म्हटले आहे.

दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेला टोला

सध्या राज्यात दिशा सालियन प्रकरण चांगलेच गाजत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना पहायला मिळत आहे. यावरूनच आता नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. दिशा सालियन प्रकरणावर चर्चा नको असे संजय राऊत यांनी आधीच किशोरी पेडणेकर यांना ठणकावले होते. तरी देखील पेडणेकर गप्प बसल्या नाहीत. त्यांनी या प्रकरणात महिला आयोगाला पत्र लिहिले तसेच सालियन परिवाराला मीडियासमोर आणल्याचे नितेश यांनी म्हटले आहे.

स्वर्थापोटी का होत नाही पण महापौर खरे बोलल्या

नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, हे सर्व सेनेतील अंतर्गत वादामुळे होत आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरेंच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी किणी प्ररकरणाची रसद आतल्या गोटातून मीडियाला पुरवण्यात आली. तेच आता शिवसेनेच्या बाबतीत आणि आदित्य ठाकरेंच्या बाबतीत घडत आहे. शिवसेनेच्या आतील गोटातूनच आदित्यला लगाम घालण्याचा प्रयत्न होत आहे. असो राजकीय स्वर्थापोटी का होत नाही पण मुंबईच्या महापौर खरे बोलत आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Nawab Malik यांच्यावरील कारवाईचं UP Election शी थेट कनेक्शन? रोहित पवारांना काय संशय?

‘सूडाचं राजकारण कोण करतंय हे उभा महाराष्ट्र पाहतोय’ मलिकांच्या ED चौकशीवर भातखळकरांचा टोला

ईडीच्या कारवाईवरुन सुधीर मुनगंटीवारांचं अमोल मटकरींच्या आरोपांना प्रत्युत्तर, फोनवरुनच जुगलबंदी!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.