AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत नोंदणी विवाहाबाबत मोठा निर्णय ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन विवाह नोंदणी बंद, तर ऑफलाईन सुरू

संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण व सक्षमीकरण गरजेचे असल्याने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे सध्या याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

मुंबईत नोंदणी विवाहाबाबत मोठा निर्णय 'या' तारखेपर्यंत ऑनलाईन विवाह नोंदणी बंद, तर ऑफलाईन सुरू
जिच्यासोबत होणार होतं लग्न तिनेच खोट्या गुन्ह्यात अडकवलं
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 6:52 AM
Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही गेल्या काही वर्षांपासून संगणकीय प्रणालीद्वारे व ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. यात नोंदणी विवाहाचाही समावेश आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण व सक्षमीकरण गरजेचे असल्याने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे सध्या याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. या अद्ययावतीकरणाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित संगणकीय प्रणालीचे कामकाज 21 जुलै 2021 पर्यंत बंद राहणार आहे.

संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यात येत असल्याने अल्प कालावधीसाठी बदल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही अल्प कालावधीसाठी ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणारे विवाह नोंदणीचे कामकाज देखील बंद राहणार आहे. यामुळे पर्यायी स्वरुपात विवाह नोंदणी विषयक कार्यवाही ही ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

विभागस्तरीय विवाह निबंधकाकडे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार

संगणकीय प्रणाली पूर्ववत होईपर्यंत महापालिकेच्या सर्व 24 विभागांमधील विवाह निबंधकाकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि मुलाखतीची तारीख व वेळ देण्यात येईल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधित संगणकीय प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे काम झाल्यानंतर प्रचलित पद्धतीने ऑनलाईन अर्ज केल्यावर प्राप्त होईल.

याबाबत अधिक माहितीसाठी विभागातील विवाह निबंधकाकडे संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असंही आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

मुलीचा प्रेमविवाह, तामिळनाडूतील आई-मावशीकडून मुंबईत येऊन सिनेस्टाईल मुलीचं अपहरण

15 जुलैनंतर पुढील चार महिने लग्नाचा एकही मुहूर्त नाही, जाणून घ्या पुढील शुभ मुहूर्त कधी

VIDEO: ‘मुलगी डॉक्टर, तिला प्रॅक्टिस करु द्या’, लग्नात आशिर्वाद देताना राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला शरद पवारांची सूचना

व्हिडीओ पाहा :

Online register marriage will be close in Mumbai for some days

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.