AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीचा प्रेमविवाह, तामिळनाडूतील आई-मावशीकडून मुंबईत येऊन सिनेस्टाईल मुलीचं अपहरण

मुंबईतील दहिसर भागात सिनेस्टाईल अपहरण झालं. मात्र, पोलिसांनी अपहरण करणाऱ्या आरोपींना तातडीने तपासाची चक्र फिरवत फक्त 5 तासांमध्ये पकडले.

मुलीचा प्रेमविवाह, तामिळनाडूतील आई-मावशीकडून मुंबईत येऊन सिनेस्टाईल मुलीचं अपहरण
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 4:44 AM
Share

मुंबई : अनेकदा गुन्हेगार गुन्हे करुन फरार होतात आणि त्यांचा शोध वर्षानुवर्षे सुरूच राहतो. मात्र, गुन्हेगारांना शोधण्यात मुंबई पोलिसांचा नावलौकिक आहे. आताही तसंच घडलंय. मुंबईतील दहिसर भागात सिनेस्टाईल अपहरण झालं. मात्र, पोलिसांनी अपहरण करणाऱ्या आरोपींना तातडीने तपासाची चक्र फिरवत फक्त 5 तासांमध्ये पकडले. पोलिसांनी या कारवाईत एकूण 4 आरोपींना अटक केली. त्यामध्ये पीडित महिलेच्या आई आणि मावशीचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपीला सातारा पुणे बॉर्डरवरील शिवापूर टोल नाकाजवळ अटक केली आहे. या अटकमध्ये आई आणि मावशीचा सुद्धा सहभाग आहे. अटकेतील आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारामध्ये राहणाऱ्या पाल सिंग नाडार यांचा 2 वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. परंतु मुलीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यानंतर मधला काळ गेल्यानंतर पीडित महिलेची आई आणि मावशी तामिळनाडूहून मुंबईतील दहिसर भागात आल्या. त्यानंतर आईने मुलीला फोन करुन भेटायला बोलावले. आईचा अचानक फोन आल्यानं पीडित महिला तातडीने आईला भेटण्यासाठी दहिसरला गेली. आईची भेट घेतल्यानंतर पीडित महिला घरी परतण्यासाठी निघाली मात्र, तिथं एका सफेद गाडी आली, आई आणि मावशीने मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि अपहरण करुन गाडी निघून गेली.

कमी वेळेत आरोपी जेरबंद कसे?

पीडित महिला आईला भेटण्यासाठी येताना सोबत दिरालाही घेऊन आली होती. दीर बाजूला उभा होता. त्यामुळे त्याने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने भावाला फोन करुन हकीकत सांगितली. त्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी (14 जुलै) एक तक्रार दाखल केली. यानंतर दहिसर पोलिसांनी वेगान तपासाची चक्र फिरवत अवघ्या 5 तासांमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी पीडित मुलीला घेऊन जात असताना शिवापूर टोल नाक्याजवळ त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती दहिसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

नागपुरात हत्येसाठी निघालेली टोळी CCTV मध्ये कैद, भररस्त्यात दहशतीचा नंगानाच, पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड, पोलिसांनी हॉटेलमधून केली अटक

ड्रग्जच्या तस्करीसाठी कॉल सेंटर मॉड्युलचा वापर; मुंबईत आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ पाहा :

Kidnapping of women by mother due to love marriage in Dahisar Mumbai

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.