AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड, पोलिसांनी हॉटेलमधून केली अटक

अकटपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश मौर्य वकिलाला भेटण्यासाठी पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा अध्यक्ष आहे.

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड, पोलिसांनी हॉटेलमधून केली अटक
राजू सापते आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी राकेश मौर्यला अटक
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 10:58 PM
Share

पिंपरी-चिंचवड : प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आलं आहे. राकेश मौर्य असं या आरोपीचं नाव आहे. राजू सापते यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला कीज हॉटेलमधून अटक केली. अकटपूर्व जामीन मिळवण्यासाठी राकेश मौर्य वकिलाला भेटण्यासाठी पिंपरीत आला होता. तेव्हा वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. राकेश मौर्य हा लेबर युनियनचा अध्यक्ष आहे. (Rakesh Maurya arrested in Art Director Raju Sapte suicide case)

राजू सापते आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. त्यांनी पुण्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला, यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा सांगितल्या आहेत.

काय म्हणाले राजू सापते?

आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजू म्हणतात, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’

‘हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’

संबंधित बातम्या :

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरण, पुण्यात एकाला अटक, चौघांचा शोध सुरु

व्हिडीओ पोस्ट करत कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; ‘या’ लोकांना धरलं जबाबदार

Rakesh Maurya arrested in Art Director Raju Sapte suicide case

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.