AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार-मोदी भेटीत नुसती हवापाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच; दरेकरांनी दिली हवा

प्रवीण दरेकर यांनी 'टीव्ही 9 मराठी'शी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. कल्पना नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. (pravin darekar)

पवार-मोदी भेटीत नुसती हवापाण्याची चर्चा होणार नाही, राजकीय चर्चा तर होणारच; दरेकरांनी दिली हवा
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 1:59 PM
Share

मुंबई: येत्या सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, असं सांगतानाच पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं सूचक विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. त्यामुळे पवार-मोदी आणि पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवर तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. (pravin darekar reaction on Sharad Pawar and PM Narendra Modi meeting in delhi)

प्रवीण दरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. कल्पना नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणं स्वाभाविक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथितही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असं त्यांना वाटलं असेल. राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणं हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं दरेकर म्हणाले.

पवारांचं राजकारण विकासाचं

शरद पवारांचं व्यक्तिमत्व वादातीत असू शकतं. पण त्यांचं राजकारण विकासाभोवती फिरतंय हे विरोधक असलो तरी आम्ही मान्य करतो. पवार मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न, राजकीय अस्थिरता, गुंतागुंतीचे विषय आणि अडचणीचे विषय आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी ते गेले असतील. एखाद्या विषयावर अंतिम उपाय हा मोदींकडेच मिळू शकतो, असं पवारांना वाटलं असेल. शिवाय या भेटीला अधिवेशनाची पार्श्वभूमीही आहे, असं त्यांनी सांगितलं.

पवार मोदींना भेटले

दरम्यान, शरद पवार यांनी आज सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे मोदींसोबतच्या बैठकीत कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. (pravin darekar reaction on Sharad Pawar and PM Narendra Modi meeting in delhi)

संबंधित बातम्या:

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

मोदींना भेटण्याआधी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा, दिल्लीत खलबतं झाल्याने तर्कवितर्कांना उधाण

“पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?”

(pravin darekar reaction on Sharad Pawar and PM Narendra Modi meeting in delhi)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती