गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला आग, अग्निशमन दलाला पाचारण
मुंबई पश्चिम उपनगरातील आरे मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबई पश्चिम उपनगरातील आरे मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला अचानक आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मेट्रो स्थानकाखाली महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग लागली असून अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
A private bus caught fire… Goregaon East, Mumbai.
Video – Whatsapp https://t.co/5TMrp9TLqH pic.twitter.com/FUtJIy13gy
— Jabar (@UKwaleBaba) September 4, 2026
मुंबईतील आरे कॉलनी मेट्रो स्टेशनजवळ एका प्रायव्हेट बसला लागलेली आग सध्या विझविण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याचे लक्षात येतात चालकाने ही बस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका बाजूला लावली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे म्हटले जात आहे. ही महादेव ट्रॅव्हल नावाची ही बस स्लिपर बस आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आग नेमकी कशी लागली, का लागली या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.
गोरेगाव पूर्व येथील चेकनाका सिग्नलजवळ गोरेगाव ओबेराय गार्डन सिटी मेट्रो स्थानकाजवळ एका स्लीपर ट्रॅव्हल बसला ही आग लागली होती. सायंकाळी ६.१५ वाजता हा प्रकार घडला. बसच्या चालकाला केबिनजवळ शॉर्टसर्कीट झाल्याचे लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला नेली. या बसमध्ये प्रवासी नव्हते अशी माहिती उघडकीस आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतू तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाल्याचे म्हटले जात आहे. स्लीपर बसेसना आगी लागण्याचे प्रमाण जास्त आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
