AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी प्रगतीच्या आड नाही, पण मराठी माणसाच्या थडग्यावर…; राज ठाकरेंचा थेट इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई मेळाव्यात केंद्र-राज्य सरकार व अदानी-अंबानींवर तीव्र हल्ला चढवला. महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाला संपवून होत असेल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ठाण्यातील नॅशनल पार्कमधील जंगलतोड करून अदानीला प्रकल्प देण्याचा गंभीर आरोप करत, मराठी हिताविरोधात 'प्लॅन' सुरू असल्याचा दावा केला.

मी प्रगतीच्या आड नाही, पण मराठी माणसाच्या थडग्यावर...; राज ठाकरेंचा थेट इशारा
| Updated on: Oct 19, 2025 | 2:40 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, मोठे उद्योजकांवर थेट हल्लाबोल केला. सी-लिंक, अटल सेतू या सर्व योजना तुमच्यासाठी नाहीत. महाराष्ट्राची प्रगती मराठी माणसाला संपवून होत असेल तर आपण ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरे यांनी नुकतंच पदाधिकारी मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप, अदानी, अंबानी आणि गुजरातचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. हे लोक जेवढं अस्तित्व आहे ते मिटवायला येत आहेत. भाजप, अदानी, अंबानी आणि गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हाला बघणार नाहीत ते तुम्हाला त्या वरंवट्याखाली मराठी म्हणूनच घेणार आहेत. सर्व गोष्टीमध्ये अदानी सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

नॅशनल पार्कमधील जंगल तोडणार

यावेळी राज ठाकरेंनी ठाण्यातील नॅशनल पार्काचा आरोप केला. प्रगतीच्या नावाखाली होणाऱ्या गोष्टींवर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला. त्यांनी ठाण्यातील नॅशनल पार्कमधील एका जागेचा मुद्दा उपस्थित केला. “ठाण्यातील नॅशनल पार्कमध्ये एक जागा बघितली आहे. हा भाग ठाण्यात येतो. तिथे जंगल तोडणार आहे. तिकडच्या आदिवासींना हटवलं जाणार आहे आणि हा सर्व भाग अदानीला दिला जाणार आहे, मग पॉवर प्रोजेक्ट टाकणार आहेत,” असा थेट आरोप राज ठाकरेंना केला.

मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्रात होणारी प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल, तर मी खपवून घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल हे रस्ते तयार करण्यात येत आहेत किंवा तुमच्यासाठी सी-लिंक, अटल सेतू या सर्व योजना तुमच्यासाठी नाहीत. हे जे उद्योगपती जमिनी घेत सुटले आहेत, त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

हे सर्व प्लॅन

सर्व गोष्टीत हात घातला जात आहे. जिथे नजर पडेल ते सर्व पाहिजे आहे. आमच्याकडे कुंपणचं शेत खात आहे. आमचीच मराठी माणसं यांना जमीन मिळवून देतात. काही मराठी लोक दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतात. केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता आहे आणि जर जिल्हा परिषदा आणि महापालिकाही हातात आल्या, तर रानच मोकळं होईल. हे सर्व सहज नाही, तर प्लॅन असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या