महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, टायगरवर हल्ला होताच बड्या नेत्याची थेट राज्यपालांकडे मागणी

संजय राऊत यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून 'जंगलराज' आले असल्याचा आरोप त्यांनी केला. अलीकडच्या काळात झालेल्या गोळीबार, हत्या आणि गँगवारच्या घटनांचा दाखला देत, त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, टायगरवर हल्ला होताच बड्या नेत्याची थेट राज्यपालांकडे मागणी
Tiger Shroff firing
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 10:31 AM

मुंबईसह महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झालं आहे. काल झालेला गोळीबार याला जंगलराज म्हणतात. कायद्याचं राज्य कोसळलं आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून क्रम पाहिला तर तुम्हाला कळेल. पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी हत्या आणि गोळीबाराचं सत्र सुरू आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे. विरोधकांना खोट्या गुन्ह्यात टाकण्यासाठी गृह खातं वापरलं जात आहे. माफिया टोळ्या मोकाट आहेत. यांना राज्य चालवता येत नाही. हे जंगल राज आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे. राज्यपालांनी केंद्राकडे तशी शिफारस केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. 1990चा अंडरवर्ल्डचा जो काळ होता, तोच परत आला आहे. गँगवार, खंडणी, धमक्या, भररस्त्यावर गोळीबार किडनॅपिंग या गोष्टी परत फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांच्या राज्यात सुरू झाल्या आहेत. काल टायगरवर हल्ला झाला. गर्दीत समोरासमोर हल्ला झाला. त्या आधी बाबा सिद्दीकींची हत्या, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला, पूर्णेकरांची हत्या झाली. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचं उघड झालं आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

Loading...

शिंदे फक्त रडायचे बाकी होते

राज्यात दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांना याची चिंता वाटते का? एकनाथ शिंदे काल ताबडतोब टायगरच्या घरी गेले. फक्त रडायचे बाकी होते. पण हेच शिंदे त्यांच्या घरासमोर पूर्णेकरांची हत्या होऊनही तिथे गेले नाही. कलाकार, उद्योगपतींवर गोळ्या चालवल्या जातात, तेव्हा त्यांची काळजी यांना आहे. या कलाकारांना झेड प्लस सुरक्षा देतील. पण शिंदे पूर्णेकरांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाला गेले नाही. पालक मंत्री म्हणून त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

तर मिनाक्षी, राजेंद्र शिंदेंना अटक केली असती

अनेक राज्यात बिश्नोई टोळी सक्रीय आहे. अमित शाह साबरमतीमधून या टोळीच्या लोकांना बाहेर काढू देत नाही. शाह त्या सर्व लोकांना संरक्षण देत आहे. त्यावर फडणवीस काही करणार आहे का? आपल्या राज्यात एका कलाकारावर हल्ला होतो, त्यावर मुख्यमंत्री कधी गांभीर्याने बोलणार आहे का? राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदेंसोबत पूर्णेकरांचे मारेकरी दिसतात. दुसरं कोणतं प्रकरण असतं तर त्यांना अटक केली असती. आरोपींबरोबर संबंध आहे म्हणून अटक केली असती. पण पूर्णेकर प्रकरणात हे होताना दिसत नाहीये, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us