Sanjay Raut : गुवाहाटीत डुकरं फार, त्यात इकडची चाळीस डुकरं तिकडं गेली, शिवसेनेच्या मेळाव्यात राऊतांची शिवराळ भाषा

| Updated on: Jun 25, 2022 | 9:57 PM

किरीट सोमय्या यांना मीडियासमोर खालच्या भाषेत शिव्या देणं असो किंवा अन्य एखाद्या नेत्यावरची टीका असो, हे महाराष्ट्राने आधीही पाहिलं आहे. मात्र एवढं मोठं बंड झालं असतानाही राऊतांची भाषा अजूनही नीट नाही. आज शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना बंडखोर आमदारांचा उल्लेख डुकरं असा केलाय. 

Sanjay Raut : गुवाहाटीत डुकरं फार, त्यात इकडची चाळीस डुकरं तिकडं गेली, शिवसेनेच्या मेळाव्यात राऊतांची शिवराळ भाषा
संजय राऊत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या मोठं पॉलिटिकल वॉर सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाचं (Eknath Shinde) बंड फक्त भारतातच नाही तर जगभरात गाजू लागलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे हे गुगलवरती सर्वात जास्त सर्च होणारे व्यक्ती ठरले आहेत. या आमदारांना बंडखोरीच कारण विचारली असता सर्वांच्या तोंडात एकच नाव आहे. ते म्हणजे संजय राऊतांचं (Sanjay Raut), संजय राऊत नेहमी काहीही बडबडत असतात. त्यांना आम्ही सिरिअर घेत नाही. संजय राऊतांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे राऊतांना पहिले आवरा, असे अनेक आमदार आणि विरोधी पक्षातील नेतेही म्हणत आहेत. हेच राऊत सध्याही मीडियात अनेक मोठी विधान करत आहे. राऊतांची शिवराळ भाषाही महाराष्ट्रासाठी काही नवी नाही. मग ते किरीट सोमय्या यांना मीडियासमोर खालच्या भाषेत शिव्या देणं असो किंवा अन्य एखाद्या नेत्यावरची टीका असो, हे महाराष्ट्राने आधीही पाहिलं आहे. मात्र एवढं मोठं बंड झालं असतानाही राऊतांची भाषा अजूनही नीट नाही. आज शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करताना बंडखोर आमदारांचा उल्लेख डुकरं असा केलाय.

संजय राऊत काय म्हणाले?

बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, गुवाहाटीत डुकरं फार आहेत, त्यात इकडचे चाळीस डुकरं तिकडं गेली, हिंमत होती तर पाय लावून पळून का गेला. गुवाहतीत काय आहे. गुवाहाती कामाक्षी देवीचं मंदिर आहे. तिकडे रेड्यांचा बळी देतात. डुकरांचा बळी देत नाही. डुकरांचा बळी आपल्याला महाराष्ट्रातच द्यायचा आहे. आपल्याकडे असंख्य देव देवता आहेत. ज्यांना अशा नैवध्य लागतो असा, असे म्हणत संजय राऊतांची भाषा आजही घसरल्याचे दिसून आले.

मी उद्धव ठाकरेंना सजावण्याचा प्रयत्न केला

तर या बंडखोरांबाबत बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले, मी या बंडखोरांना दोन दिवस समजवण्याचा प्रयत्न केला. यांना मुंबईत येण्याचं आवाहन केलं. मात्र यांनी काही ऐकलंं नाही. त्यामुळे शिवसेनेची दारं यांनी बंद करून घेतली आहे. आम्ही बाकी कुणाला मानत नाही आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानतो. आणि तुम्ही त्यांचा देव धर्म पळवता, ही अफझल खानाची औलाद आहे. शिवसेनेला ज्या पक्षाने समजावण्याचा विडा उचलला आहे. त्या पक्षाच्या मांडीला तुम्ही मांडी लावून बसता, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या चर्चेवरही हल्लाबोल चढवला आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतली ही दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.