उद्धव साहेबांनी त्याला बाजूला घेऊन बसू नये, त्याची लायकी नाही, संजय शिरसाट यांची टीका

| Updated on: May 21, 2023 | 2:46 PM

खरा गुन्हेगार संजय राऊत यांच्या पक्षातला आहे. म्हणून उद्धव साहेबांनी त्याला बाजूला घेऊन बसूदेखील नये. संजय राऊत यांची लायकीदेखील नाही.

उद्धव साहेबांनी त्याला बाजूला घेऊन बसू नये, त्याची लायकी नाही, संजय शिरसाट यांची टीका
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुमेध साळवे, प्रतिनिधी, मुंबई : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. कायदेशीर मार्गाने कोश्यारी यांना गुन्ह्याची फळं मिळणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. तर, भगतसिंह कोश्यारी यांना गुन्हेगार ठरवणारे संजय राऊत कोण, असा सवाल शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. संजय राऊत हे ठाकरे गटाचे गुन्हेगार असल्याचा पलटवारही शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाट म्हणाले, कर्नाटकमध्ये अनेक वर्षानंतर काँग्रेसला विजय मिळालेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यांना वाटतं की अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे सत्ता येईल. मध्य प्रदेशमध्ये काय, छत्तीसगडमध्ये काय आहे. अनेक राज्यांमध्ये तुमच्या अवस्था काय आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोष वाढवण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे, असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

खरा गुन्हेगार संजय राऊत

संजय राऊत यांनी माजी राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राचे गुन्हेगार म्हटलं. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, गुन्हेगार कोण आहे ठरवणारा संजय राऊत नाही. संजय राऊत यांना तो अधिकार नाही. संजय राऊत यांची कुवतदेखील नाही. खरा गुन्हेगार संजय राऊत यांच्या पक्षातला आहे. म्हणून उद्धव साहेबांनी त्याला बाजूला घेऊन बसूदेखील नये. संजय राऊत यांची लायकीदेखील नाही.

हे सुद्धा वाचा

कोण कोणाला भेटायला गेलं. सर्वसामान्यांचा प्रश्नांचा काही संबंध नाही. तुम्ही फारुख अब्दुल्ला भेटू शकता. तुम्ही त्यांच्या मुलांना भेटू शकता. तुम्हाला कोणी विचारलं की हिंदुत्व तुम्ही जोपासू शकता तर तेव्हा कशी मिरची लागेल. तुम्हाला त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेलं कधीही बरं, असा टोला संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी लगावला.

मातोश्रीला दारोदार फिरावे लागते

या लोकांनी कधी ग्राउंड लेव्हलला राजकारण केलेलं नाही. यांनी निवडणुका लढवलेल्या नाहीत. ठोकताळे एका केबिनमध्ये बसून करता येतात. ग्राउंड लेव्हलला काय आहे. हे त्यांना माहीत नाही. 2019 ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, हे सर्व जनतेला माहिती आहे.

ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सरकार होतं त्याआधी मातोश्रीला कुठेही दारोदारी फिरावं लागत नव्हतं. मात्र आता फिरावे लागते, असा टोलाही संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला लगावला.

बाकीचे काय गोट्या खेळणार?

ठाकरे गटाला लोकसभेला दोन किंवा तीन जागा दिल्या जातील. संजय राऊत यांना असं वाटतं की 40 जागा ठाकरे गटाला दिल्या जातील आणि 8 जागा काय राष्ट्रवादी काँग्रेस घेतील, बाकीचे काय गोट्या खेळणार आहेत का?, असा सवालही संजय शिरसाट यांनी केला.

संजय राऊत यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस सिरीयस घेत नाहीत. कारण संजय राऊत यांची औकात किती हे त्यांना माहीत आहे. संजय राऊत यांना कधी आघाडी व्हावी, असं वाटत नाही. ठाकरे गटाला डुबवण्याचे काम संजय राऊत यांना दिलेला आहे. त्याचाच आधार घेत ते वक्तव्य करत असतात, असंही संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना सुनावलं.