AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं’

अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. सामान्य लोकांच्या घराघरातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे.

'राम मंदिर ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे हिंदुंच्या श्रद्धेला ठेच पोहोचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं'
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 14, 2021 | 11:02 AM
Share

मुंबई: अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. या सगळ्यावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. (2 Crores To 18 Crores In Minutes Ram Temple Trust Accused Of Land Scam)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याला आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी फोन करुन या घोटाळ्याची माहिती दिल्याचे सांगितले. संजय सिंह यांनी सादर केलेले पुरावे धक्कादायक आहेत. अयोध्या हा इतरांसाठी राजकारणाचा भाग असला तरी आमच्यासाठी तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. सामान्य लोकांच्या घराघरातून राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यात आली आहे. या निधीचा गैरवापर होणार असेल तर श्रद्धेला काही अर्थ राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

नेमंक काय आहे प्रकरण?

अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्याने देशभर एकच खळबळ उडाली असून ट्रस्टच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.

उत्तर प्रदेशात पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा हा घोटाळा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जो भूखंड 2 कोटींचा आहे. तो अवघ्या दहा मिनिटात 18 कोटींचा करण्याची किमया ट्रस्टने साधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली हा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

संबंधित बातम्या:

हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ

(2 Crores To 18 Crores In Minutes Ram Temple Trust Accused Of Land Scam)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...