AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे की ठाकरे; मुंबईत महापौर कोणाचा? संजय राऊतांनी थेट फॉर्म्युला सांगितला

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीची शक्यता बळावली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीवर संजय राऊत यांनी भाष्य केले. या बैठकीत जागावाटप आणि मुंबईसह इतर महापालिकांच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले.

मनसे की ठाकरे; मुंबईत महापौर कोणाचा? संजय राऊतांनी थेट फॉर्म्युला सांगितला
| Updated on: Oct 06, 2025 | 10:43 AM
Share

सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र महापालिका लढवणार असल्याचे बोलल जात आहे. याच पार्श्वभूमीवर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी कोणचा महापौर होईल, याबद्दलचीही माहती दिली.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर माहिती देत, कोणत्या विषयांवर चर्चा केली, याबद्दल सांगितले. कोणी काहीही म्हणत असलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नाते अत्यंत घट्ट झालेले आहे. कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी गोष्ट आता खूप पुढे गेली आहे. माघारीचे दोर आता नाहीत. प्रकरण फार पुढे गेले आहे. कोणीही कोणत्या मेळाव्यात काय वक्तव्य केलं आणि नंतर पाहू हे कसे एकत्र येतात, तुमच्या छाताडावर पाय रोवून ठाकरे बंधू याक्षणी मनस्थितीत आहेत, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

चर्चेचा अंतिम टप्पा

कालं ते नक्कीच आमच्या एका कौटुंबिक सोहळ्याला एकत्र होते. नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले. दोघात राजकीय चर्चा झाली. मुंबईसह महाराष्ट्रात २७ महापालिका आहेत. हा खेळ आहे का, अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर चर्चा होणं गरजेचे आहे. प्रत्येक महापालिकेची स्थिती ही वेगळी आहे. प्रत्येक महापालिका हद्दीत राजकीय इतर परिस्थिती वेगळी आहे. कुठे आरक्षण आहे, कुठे पॅनल सिस्टिम आहे, या सर्व गोष्टींवर आमची चर्चा होत आहे. प्रत्येक महापालिकेबद्दल दोन्हीही पक्षाचे प्रमुख चर्चा करत आहेत. त्यात आम्ही असावं असं नाही. स्थानिक पातळीवर जे प्रमुख नेते आहेत त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.

कालच्या सोहळ्याला सुप्रिया सुळेही होत्या. त्यामुळे मविआ आहेच. ते कुठेही सोडून गेलेले नाहीत. महाविकासआघाडीचे अस्तित्व कायम आहे. तिची भूमिका, काम आणि महत्त्वं कायम आहे. महापालिका निवडणुकीत कुठे आपण कोणाकोणला सामावून घेऊ शकतो. तसेच मनसे आम्हाला कुठे कुठे सामावून घेऊ शकते. ही गणित वेगवेगळी आहेत. ती तशीच राहणार आहेत. त्यात बदल होणार नाही. कुठे फक्त शिवसेना, कुठे फक्त मनसे, कुठे मनसे आणि शिवसेना असं असेल. त्यानुसार फॉर्म्युला ठरेल, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईचा महापौर कोण?

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकमत आहे. याप्रमुख महापालिकेवर काम करावं लागेल. मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचा होईल. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही, असे संजय राऊतांनी म्हटले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार