AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार! कुक रोटीवर थुंकला Video व्हायरल

Viral video: या प्रकरणी रोटी बनवणाऱ्या कामगारासह हॉटेलच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुकचा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबईतील हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार! कुक रोटीवर थुंकला Video व्हायरल
GoregaonImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 28, 2026 | 1:28 PM
Share

अनेकजण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जेवायला जायचा प्लान बनवत असतात. पण कधी कधी कोणत्या हॉटेलमध्ये जावे? तेथे स्वच्छता असेल ना? असा प्रश्न अनेकांना पडतो. नुकताच मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगरमध्ये एक अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका हॉटेलमध्ये रोटी बनवताना ती भट्टीत टाकण्यापूर्वी त्यावर थुंकल्याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी रोटी बनवणाऱ्या कामगारासह हॉटेलच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या संतोष नगर येथील ‘फिश कोळीवाडा’ या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी रोटी बनवताना, भट्टीवर रोटी भाजण्यापूर्वी कामगार त्या कच्च्या रोटीवर थुंकत असल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार एका जागरूक व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ग्राहकांच्या आरोग्याशी आणि स्वच्छतेशी सुरू असलेला हा खेळ उघडकीस आला.

आरोपींवर कारवाई

मोबाईलमध्ये चित्रित झालेला हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कौशार शेख (रोटी बनवणारा कामगार) आणि फैय्याज शेख (हॉटेल मालक) असे दोघांचे नाव आहे.

ग्राहकांमध्ये संतापाची लाट

‘फिश कोळीवाडा’ हॉटेलमधील या घटनेमुळे परिसरात आणि ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आपण पैसे देऊन जे अन्न खातो, ते अशा पद्धतीने अस्वच्छ आणि किळसवाण्या मार्गाने बनवले जात असेल, तर बाहेरचे खाणे किती सुरक्षित आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Follow Us
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम