AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धिविनायक मंदिराच्या कॉरिडोअर प्रकल्पाचा वाद चिघळला, मैदानासाठी नागरिक रस्त्यावर

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर बाधित होणाऱ्या नर्दुल्ला टँक मैदानावरून नागरिक संतापले आहेत. मैदान वाचवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिद्धिविनायक मंदिराच्या कॉरिडोअर प्रकल्पाचा वाद चिघळला, मैदानासाठी नागरिक रस्त्यावर
Siddhivinayak Corridor ProjectImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 27, 2026 | 2:50 PM
Share

गिरीश गायकवाड प्रतिनिधी: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नर्दुल्ला टँक मैदानावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. या मैदानावर प्रस्तावित असलेल्या पार्किंगच्या जागेला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट या प्रश्नावर चांगलाच आक्रमक झाला आहे. मैदान वाचवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराशेजारील मैदान परिसरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिकांचा आणि ठाकरे गटाचा विरोध का?

प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदान हे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे मैदान लहान मुलांसाठी हक्काचे खेळाचे ठिकाण आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ फिरण्याची हक्काची जागा आहे. याशिवाय, वर्षभर अनेक सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रम याच मैदानावर आयोजित केले जातात. मात्र, सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत या मैदानावर पार्किंग प्रस्तावित केल्याने नागरिकांच्या हक्काची मोकळी जागा हिरावून घेतली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोर्चाची हाक आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि मैदान सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात स्थानिक आमदार महेश सावंत आणि नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आपले हक्काचे मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या हक्काच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

महेश सावंत यांनी दिली प्रतिक्रिया

आमचा विरोध हा सिद्धिविनायक कॉरिडोरला नाहीये. आमचा विरोध मैदान घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला आहे. मात्र, शिवसेना असताना त्यांचा हा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही असे महेश सावंत यांनी म्हटले होते.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?