मुंबईत Thar चालकाचा कहर; दोन बाइकस्वारांना ठोकरले, व्हायरल व्हिडीओने युजर्सचा संताप

मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर हरियाणाच्या रजिस्ट्रेशन क्रमांक असलेल्या एका महिंद्रा थार चालकाने दोन दुचाकीस्वारांना ठोकरले आणि चालक फरार झाला आहे.व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तपास सुरु केला आहे

मुंबईत Thar चालकाचा कहर; दोन बाइकस्वारांना ठोकरले, व्हायरल व्हिडीओने युजर्सचा संताप
Thar hit and run
| Updated on: Jul 09, 2026 | 5:47 PM

मुंबईच्या रस्त्यांवर वेगवान थार कारने अनेक दुचाकी चालकांना धडक मारत पाडल्याचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. हरियाणा येथील रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा थार कार (Mahindra Thar)चालकाने मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यावर ज्या प्रकारे वाहन दामटले ते पाहून कोणाच्याही मनाचा थरकाप होईल. या नियंत्रणाबाहेर गेलेल्या कार चालकाने एका पाठोपाठ एक असा दोन दुचाकी चालकांना ठोकरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स थार चालकावर भडकले आहेत.

व्हायरल व्हिडियोत दिसले खतरनाक दृश्य

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ स्पष्ट दिसत आहे की हरियाणा रजिस्ट्रेशन क्रमांक असलेल्या HR 98 X 5101 वाली एक महिंद्र थार कार मुंबईच्या रस्त्यावर बेपर्वा चालताना दिसत आहे. अचानक या एसयूव्हीने पुढे जाणाऱ्या आणखी एका बाईकला पाठून धडक दिली. त्यावर बसलेले दोघे जण थेट रस्त्यावर कोसळले.मात्र, या थार चालकाने तशीच कार पुढे पळवल्याचे दिसत आहे.या थार चालकाचा व्हिडीओ एकाने शुट करुन व्हायरल केला आहे.

पहिल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर काही मीटर अंतरावर या थार चालकाने आणि एका दुचाकीला टक्कर मारली. दुसऱ्या बाईकला पाडल्यानंतर थार चालक वेगाने तेथून पसार झाला. खुलेआम झालेल्या हा हिट एंड रनने तेथे हजर असलेले लोक आणि आता सोशल मीडिया युजर्सना हादरवले आहे.

मुंबई पोलिसांची कठोर कारवाई

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या थार चालकाविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या थार चालकाचा शोध घेतला आणि या चालकाविरोधात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इंटरनेट युजर्सच्या प्रतिक्रीया

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंटरनेट युजरनी आरोपी ड्रायव्हरला लागलीच अटक करुन त्याचे लायसन्स लागलीच रद्द करण्याची मागणी केली आहे. अनेक युजर्सचे सांगितले की दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बड्या बापाच्या धेंडांना आणि बेपर्वा चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे इतर वाहन चालक सुरक्षित राहू शकतील. सध्या पोलीसांनी या थार ड्रायव्हरचा शोध सुरु केला आहे.

येथे पोस्ट वाचा…

 

Follow Us