AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या, मुंबई उच्च न्यायालयात मातेची धाव, काय झालं नेमकं ?

एका तरुणाला कॅन्सर झाला होता. त्याला केमोथेरपी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतू केमोथेरपीच्या कारणाने नपुंसकता येऊ शकते त्यामुळे त्याने आपले स्पर्म एका फर्टीलिटी सेंटरमध्ये जमा करुन ठेवले होते.

'माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या, मुंबई उच्च न्यायालयात मातेची धाव, काय झालं नेमकं ?
| Updated on: Jun 28, 2025 | 12:05 PM
Share

मुंबई उच्च न्यायालयात एक वेगळ्याच प्रकारची प्रकरण दाखल झाले आहे. या प्रकरणात एका असहाय मातेने मुलाच्या स्पर्मसाठी कोर्टात धाव घेतली आहे. संबंधित मृत युवकाचे फ्रीज केलेले वीर्य या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत सुरक्षित सांभाळून ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका फर्टीलिटी सेंटरला दिले आहेत.

याचिकाकर्ता महिलेचा मुलाला कॅन्सर झाला होता. कॅन्सरशी झंजताना त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्याने त्याचे स्पर्म फ्रीज करुन सांभाळून वीर्य बँकेत ठेवले होते.परंतू या मुलाच्या मृत्यूनंतर फर्टीलिटी सेंटरने त्याच्या आईला सीमन देण्यास नकार दिला. त्यामुळे या दुर्देवी मुलाच्या आईने कोर्टात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती काय म्हणाले ?

जस्टीस मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायमूर्ती म्हणाले की जर सुनावणी पूर्ण होण्याआधी जर संबंधी तरुणाचे सीमन खराब झाले किंवा नष्ट केले गेले तर याचिकेचा हेतूच नष्ट होईल त्यामुळे या फर्टीलिटी सेंटरला ही याचिका निकाली निघेपर्यंत तरुणाचे सीमन सांभाळून ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

याचिकेत महिलेने म्हटलेय की तिचा मुलाला कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा एका ऑन्कोलॉजिस्टने वीर्य फ्रीज करण्याचा सल्ला दिला होता. कारण केमोथेरपीने नंपुसकता होण्याची भीती असते. मुलाने कुटुंबाचा सल्ला न घेता परस्पर एका फॉर्मवर सही करीत हा पर्याय निवडला की त्याच्या मृत्यूनंतर हे स्पर्म नष्ट करावे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हा तरुण कोणतेही इच्छापत्र न लिहीता मृत्यू पावल्याने आता फर्टीलिटी सेंटरने स्पर्म देण्यास नकार दिला आहे.

आयव्हीएफ तंत्राने ५८ व्या वर्षी मुलाला जन्म

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची साल मे २०२२ मध्ये निर्घृन हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली होती. सिद्धू मुसेवाला हा एकुलता एक मुलगा गमावल्याने त्याचे आई-वडील प्रचंड दु:खी झाले होते. त्यानंतर सिद्धूच्या आईने 58 व्या वर्षी आयव्हीएफ तंत्राने मुलाला जन्म दिला होता.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?