AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete passes away : सामाजिक कार्याचा गौरव करत राजकीय क्षेत्रातून विनायक मेटेंना श्रद्धांजली

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, नितीन राऊ, भास्कर जाधव आदींनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Vinayak Mete passes away : सामाजिक कार्याचा गौरव करत राजकीय क्षेत्रातून विनायक मेटेंना श्रद्धांजली
विनायक मेटेImage Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 14, 2022 | 11:17 AM
Share

बीड : मराठा समाजासाठी विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे मोठे योगदान होते. मला सकाळी सहा वाजता चंद्रकांत दादा पाटील यांनी फोन केला आणि विनायक मेटे यांचा अपघात झाला, असे कळवले. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली होती. 15 ऑगस्टनंतर आपण भेटून बोलू, असे ते म्हणाले होते. त्यांना नेमके काय बोलायचे होते, ते राहूनच गेले, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली आहे. तसेच विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे, अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. विनायक मेटे यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळीच समजले. अत्यंत धक्कादायक वृत्त… त्यांनी मराठा समाजासाठी संघर्ष केला. संघर्षशील नेता आपल्यातून निघून गेला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे.

छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे, की अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे हे लढवय्या नेते होते. कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले.शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते नेहमीच पुढे असायचे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या करून अखेर पर्यंत संघर्ष केला.एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय मेटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

नितीन राऊत

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सदैव आक्रमकपणे लढणारे नेते विनायक मेटे यांच्या निधनाने राज्याने विकासाची विधायकदृष्टी असलेला नेता आणि मराठा समाजाने आपला बुलंद आवाज गमावला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मेटे यांनी आपले आयुष्य पणाला लावले. मराठा समाजाच्या तसेच शेतकऱ्यांच्या विकासाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी नियोजनबद्ध आणि सनदशीर पद्धतीने प्रभावी लढा उभारला. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने आपला बुलंद आवाज गमावला. विधिमंडळात त्यांचे काम मला जवळून बघता आले. शून्यातून विश्व उभे करणारा त्यांचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे.यांचे कुटूंब,आप्त आणि मित्र परिवार यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे डॉ राऊत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

भास्कर जाधव

विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी मोठे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रात व्हावे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. ते त्यांच्या ध्येयाशी ठाम होते. त्यांचे असे दुर्दैवी निधन होईल, असे वाटले नव्हते. या आघातातून त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती द्यावी, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा