Vinayak Mete passed away : तासभर आधीच उपचार मिळाले असते तर…? विनायक मेटेंचे सहकारी एकनाथ कदम म्हणतात की…

एकानेही गाडी थांबवून मदत नाही केली, असं एकनाथ कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दरम्यान, एका छोटाशा टेम्पो चालकाने विनायक मेटे यांच्या अपघातग्रस्त वाहनाला पाहून गाडी थांबवली आणि मदत केली, असं कदम यांनी म्हटलंय.

Vinayak Mete passed away : तासभर आधीच उपचार मिळाले असते तर...? विनायक मेटेंचे सहकारी एकनाथ कदम म्हणतात की...
विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूच्या तपासाला वेगImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:01 AM

नवी मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete News) यांच्या झालेल्या अपघाती मृ्त्यूनंतर रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai Pune Expressway) हा देखील मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. दरम्यान, ज्या खोपोली विनायक मेटे (Vinayak Mete passes away) यांचा अपघात झाला, तिथं घडलेल्या अपघातानंतर नेमकं काय घडलं, याची माहिती कार चालकानं दिली आहे. चालक एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार तासभर कुणीच मदत केली नाही, असं समोर आलं आहे. त्यामुळे जर वेळीच विनायक मेटे यांना उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता, असाही तर्क लढवला जातोय. चालक एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांना अपघातानंतर तासभर मदत मिळू शकली नाही. अनेक गाड्या थांबवून मदत मागण्यासाठी प्रयत्न कऱण्यात आले. पण एकानेही गाडी थांबवून मदत नाही केली, असं एकनाथ कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दरम्यान, एका छोटाशा टेम्पो चालकाने विनायक मेटे यांच्या अपघातग्रस्त वाहनाला पाहून गाडी थांबवली आणि मदत केली, असं कदम यांनी म्हटलंय. पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. आणि सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नवी मुंबईच्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात विनायक मेटे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.

तासभर उशिरा उपचार

एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला का, याबाबत शंका व्यक्त केली आहे. मात्र उपचाराआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती, असंही ते म्हणाले आहेत. उपचाराआधी विनायक मेटे यांची पल्स, हार्टबीट आणि बीपी चेक करण्यात आला होता. या प्राथमिक बाबींच्या तपासणीत विनायक मेटे यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी मृत घोषित केलं. 5.05 मिनिटांनी खोपोलीजवळ विनायक मेटे यांच्या फोर्ड एन्डेव्हर कारचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या कारची डावी बाजू चक्काचूर झाली होती. तर चालकाकडच्या बाजूला तितकसं नुकसान झालेलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

विनायक मेटे कदाचित वाचले असते…

दरम्यान, या अपघातानंतर लगेचच विनायक मेटे यांना वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता, असंही आता बोललं जातंय. दरम्यान, या भीषण अपघातामध्ये विनायक मेटे यांच्या डोक्याला मागच्या बाजूस जबर मार बसला होता. तसंच त्यांच्या हाताला, मांडीला आणि पायाला देखील मोठी जखम झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतलेल्या विनायक मेटे यांच्या जाण्यानं संपूर्ण मराठा समाजावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे ते मराठा आरक्षणाविषयीच्या बैठकीसाठीच मुंबईला यायला निघाले होते. दुपारी 12 वाजता त्यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक होणार होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतरही महत्त्वाचे नेते हजर राहणार होते. पण बीडहून पुण्यामार्गे मुंबईला येत असतेवेळी काळानं विनायक मेटे यांना गाठलं. त्यांच्या अकाली अपघाती मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.