AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे मुनगंटीवारांनाही नकोसे, एका महिन्यात दुसरी बदली

मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. नियोजन विभाग हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येतो. सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोसे झाल्याचं बोललं जात होतं. अखेर मुंढेंना दुसरीकडे साईड पोस्टिंग देण्यात आली […]

तुकाराम मुंढे मुनगंटीवारांनाही नकोसे, एका महिन्यात दुसरी बदली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. नियोजन विभाग हा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे येतो. सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोसे झाल्याचं बोललं जात होतं. अखेर मुंढेंना दुसरीकडे साईड पोस्टिंग देण्यात आली आहे.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढे – एड्स नियंत्रण सोसायटी, प्रकल्प संचालक, मुंबई

साई बाबा संस्थानच्या सीईओ रुबल प्रखेर अग्रवाल – अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले – अध्यक्ष, NRMDA, नागपूर

बालाजी मंजुळे – दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं. वाचा – तुकाराम मुंढेंचे ‘हे’ आठ निर्णय रद्द, मनमानीमुळे पीएमपी तोट्यात

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं. वाचा – तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, चूक एकच – ‘नियमाने काम’

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. वाचा – भल्याभल्यांना धडकी भरवणारे तुकाराम मुंढे पहिल्यांदाच इमोशनल

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली. वाचा – माझं काम सुरुच राहिल, हसतमुखाने तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना निरोप

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

 

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...