5

तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, चूक एकच – ‘नियमाने काम’

मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून ते आता काम पाहतील. भाजप नगरसेवकांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंची बदली केल्याचं बोललं जात आहे. तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या 2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर 2007 प्रकल्प अधिकारी, धारणी 2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड 2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद 2009 […]

तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, चूक एकच - 'नियमाने काम'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून ते आता काम पाहतील. भाजप नगरसेवकांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंची बदली केल्याचं बोललं जात आहे.

तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या

2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर

2007 प्रकल्प अधिकारी, धारणी

2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड

2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद

2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक

2010 के. व्ही. आय. सी. मुंबई

2011 जिल्हाधिकारी, जालना

2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर

2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई

2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका

2017 पीएमपीएमएल, पुणे

2018 नाशिक महापालिका आयुक्त

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची बदली आता नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Non Stop LIVE Update
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
सरकार सकारात्मक, उपोषण सोडा, मुख्यमंत्री शिंदे यांची कुणाला विनंती?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
ते आमचे सहकारी; पण... स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
शरद पवार यांच्या फोटोवरून हा नेता म्हणाला, 'कुणाकडे नाराजी...?'
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
'त्या ५० आमदारांमध्ये माझं नाव नाही 'मी' भाग्यवान', आमदाराने सांगितलं
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
घरगुती देखाव्यातून उलगडली तंतुवाद्यांच्या माहेरघराची यशोगाथा
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले...
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
प्रकाश आंबेडकरांचं लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले..
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीस म्हणाले...
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
'... भाजपनं माफी मागावी', सुप्रिया सुळेंचा बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..
राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन अन्..