Salman Khan | सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे होते आदेश? महत्त्वाची माहिती समोर

सलमान खान गोळीबार प्रकरणात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना गोळीबार करण्याच्या काही तासांआधी अनोळखी व्यक्तीकडून पिस्तूल देण्यात आली होती. तसेच या आरोपींना वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या वस्तू या अनोळखी व्यक्तींकडून देण्यात आल्या होत्या, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.

Salman Khan | सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे होते आदेश? महत्त्वाची माहिती समोर
salman khan
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 10:06 PM

अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणी वेगाने तपास सुरु आहे. गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. या तपासातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना विविध टप्यावर अनोळखी व्यक्तींकडून विविध गोष्टी पुरवण्यात आल्याची माहिती तपासात समोर येत आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी या वस्तू देण्यासाठी येणारी व्यक्ती आरोपींसाठी अनोळखी असायची. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते. त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आरोपींना अनोळखी व्यक्तींकडूनच सीमकार्ड पुरवण्यात आले होते. मात्र या अनोळखी व्यक्ती आणि आरोपींमध्ये समन्वय ठेवणारी व्यक्तीही एकच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही आरोपी फायरिंगचा कट रचताना अनमोल बिष्णोईच्या संपर्कात होते. फायरिंग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर दोघांमध्ये एक व्यक्ती हा मध्यस्थी म्हणून काम करत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी नेमबाजांना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला. मात्र बंदूक पुरवणारी व्यक्ती कोण होती? याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे होते आदेश

या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झालाय. सलमानला घाबरवण्यासाठीच बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आलं होत. 2 मॅगेझिन अर्थात 12 गोळ्या फायर करा, असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले होते. मात्र, हल्लेखोरांना 12 गोळ्या फायर करता आल्या नाहीत. दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर येत आहे. काम फत्ते झाल्यावर आरोपींना नंतर आणखी 3 लाख मिळणार होते.

आधी मिळालेल्या 1 लाखात आरोपींनी काय काय केलं ?

आरोपींनी 24 हजाराची सेकंडहँड बाईक घेतली. नवीन रूम भाड्याने घेण्यासाठी 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले. तर साडेतीन हजार रूम भाडे ठरवले. जवळपास 11 महिन्याचे अग्रिमेंट दोन्ही आरोपींकडून करण्यात आले होते. आरोपींना पिस्तुल पुरवण्यात आले. ते कोणी दिलं याचा तपास सुरु आहे. विकी गुप्ता हा दहावी पास आहे तर सागर पाल आठवी शिकलेला आहे. आरोपी फायरिंग केलेल्या दिवशी रात्रभर बांद्रा बँडस्टैंड परिसरात फिरत होते.

अनमोल बिश्नौइने दोघांना हे टारगेट दिले होते. त्यामुळे त्याला पहिला आरोपी म्हणण्यात आलंय. अनमोल दोन्ही आरोपींच्या थेट संपर्कात होता. मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईची कोठडी घेण्याची शक्यता आहे. आरोपींचे क्रिमिनल बॅकग्राउंड तपासले जात असून बिश्नोई गँगचा समावेश पाहता मोक्का लावला जाऊ शकतो का? याची पडताळणी पोलीस घेत आहेत.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.