AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Gaikwad : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना, ट्विटरवरुन माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.

Varsha Gaikwad : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना, ट्विटरवरुन माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन
varsha gaikwad
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 28, 2021 | 11:10 AM
Share

मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. सोमवारी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. वर्षा गायकवाड यांनी काल कोरोना सदृश्य लक्षणं जाणवत होती, त्यानंतर मी स्वत: ला आयसोलेट करुन घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलं आहे.

वर्षा गायकवाड यांचं ट्विट

कोरोनाची सौम्य लक्षण

वर्षा गायकवाड यांनी कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची माहिती ट्विटवरुन दिली आहे. कोरोनाची लक्षणं सौम्य असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या प्रकृती व्यवस्थित असून सुरक्षेच्या कारणामुळं आयसोलेट करुन घेतलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

के.सी. पाडवी यांनाही कोरोना ससंर्ग

काँग्रेस नेते आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना ससंर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देखील आयसोलेट झाले होते. काल के. सी. पाडवी आणि आज वर्षा गायकवाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

भाजप आमदार समीर मेघे यांनाही कोरोना

भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याचं रविवारी समोर आलं होतं. त्यानंतर विधानसभेतील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली होती. भाजप आमदार समीर मेघे यांनी फेसबुकवर पोस्ट करत स्वतःला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. त्यांनी स्वतःच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचा सल्लाही दिला होता.

इतर बातम्या:

Omicorn | महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा उच्चांक, मुंबईत सर्वाधिक रुग्ण, कुठे किती रुग्ण? वाचा सविस्तर

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लान; कधी, कुठे आणि किती जणांना मिळणार लस? वाचा सविस्तर

Varsha Gaikwad tested corona positive education minister gave information via tweet

Follow Us
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला